पोटभर बिर्याणी खा फक्त 40 रुपयांत, पण कुठं आहे हे ठिकाण?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
धार्मिक आणि नैसर्ग पर्यटनासाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे. तसंच इथल्या खाद्य संस्कृतीसाठी फेमस आहे.
नाशिक 13 सप्टेंबर: महाराष्ट्रातील धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचं केंद्र म्हणून नाशिकची ओळख आहे. तसेच खवय्यांच माहेरघर म्हणून देखील नाशिक प्रसिद्ध आहे. येथील खाद्य संस्कृतीतील अनेक पदार्थ महाराष्ट्रभर फेमस आहेत. त्यातीलच एक म्हणजे रविवार कारंजा वरील चिराग व्हेज बिर्याणी होय. ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते.
चिराग व्हेज बिर्याणीची सुरुवात 9 वर्षांपूर्वी सुभान अली यांनी केली होती. तर आतापर्यंत या व्हेज बिर्याणीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून ग्राहक या ठिकाणी व्हेज बिर्याणी खाण्यासाठी येत असतात. घरगुती मसाल्यामध्ये ही व्हेज बिर्याणी बनवल्या जाते. त्यामुळे ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी अधिक ग्राहकांची पसंती आहे.
advertisement
बिर्याणीची काय आहे खासियत ?
चिराग बिर्याणी येथे तीन प्रकारच्या बिर्याणी मिळतात. व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, पनीर टिक्का बिर्याणी ही बिर्याणी तुम्ही एकदा खाल्ली की खुश व्हाल कारण चविष्ट आणि अप्रतिम अशी ही बिर्याणी आहे. बिर्याणी बनवण्यासाठी सुभान अली बाहेरून मसाले आणत नाहीत ते स्वतः घरगुती मसाले तयार करून वापरतात. तांदूळ देखील उत्तम प्रतीचा वापरतात. त्यामुळे बिर्याणी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही किंवा पोटात जळजळ देखील होणार नाही. त्यामुळे अधिक ग्राहक या बिर्याणीकडे आकर्षित होतात.
advertisement
40 रुपयात फुल प्लेट बिर्याणी
ग्राहकांना बिर्याणीचा आस्वाद घेता यावा या करिता 40 रुपयात फुल प्लेट बिर्याणी आम्ही देतो. एक प्लेट खाल्ली की तुमचं पोट भरून जातं. तस इतर ठिकाणी पोटभर खायचं म्हणजे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात आणि एखादा खूपच गरीब व्यक्ती असेल ज्याच्याकडे पैसे नसतील अशा व्यक्तीला आम्ही मोफत बिर्याणी देऊन टाकतो असं, चिराग व्हेज बिर्याणीचे सुभान अली सांगतात.
advertisement
कुठं मिळतेय व्हेज बिर्याणी?
नाशिक शहरात 5 ठिकाणी चिराग व्हेज बिर्याणीच्या शाखा आहेत. जुने सीबीएस परिसर, भद्रकाली, रविवार कारंजा, उत्तमनगर, नाशिकरोड, या ठिकाणी आहेत. तुम्ही कोणत्याही शाखेत गेलात तरी बिर्याणीची चव एकच असेल उत्तम प्रतीचीच बिर्याणी तुम्हाला इथं खायला मिळेल. बिर्याणी तुम्हाला पार्सल देखील मिळू शकते. त्यासाठी 8975990920 या नंबर वर तुम्ही अधिक चौकशी करू शकता.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 13, 2023 5:36 PM IST