50 वर्षांपासून प्रसिद्ध आहे पुण्यात हा वडापाव; एक खाल्ला तरी भागेल तुमची भूक

Last Updated:

पुण्यातील कॅम्प परिसरातील या वडापावला खवय्याची पहिली पसंती आहे.

News18
News18
पुणे, 13 सप्टेंबर : वडापाव हा अनेकांना आवडणारा पदार्थ आहे. तो खाण्यास कमी वेळ लागत असल्यानं धावपळीच्या आयुष्यात अनेकदा तात्पुरती भूक भागवण्यासाठी वडा-पावचा आस्वाद घेतला जातो. मुंबईतील वेगवेगळ्या भागात वडापाव प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुण्यातील वडापावनंही खवय्यांच्या मनात खास जागा केली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातली गार्डनचा वडापाव हा देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.
कधी झाली सुरुवात?
या वडापावचे सध्याचे मालक नंदू नायकू आहेत. यांच्या आई-वडिलांनी 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 साली कॅम्पमधील गार्डन भागात हा वडापाव सुरू केला आहे. तेव्हापासूनच हा वडापाव पुणेकर खवय्यांचा लाडका वडापाव म्हणून ओळखला जातो. या वडापावची खासियत म्हणजे हा वडापाव इतर वडापावपेक्षा आकारानं मोठा असतो. तसेच या वडापावसोबत मिळणाऱ्या मिरचीची चव देखील इतर मिरचीपेक्षा वेगळी आहे. तसंच सोबत देण्यात येणारा चटणीही चविष्ट असते, असं ग्राहक सांगतात.
advertisement
समोसा रस्सा राईस खाल्लाय का? एकदा चव चाखाल तर पुन्हा जाल
हा वडापाव एवढा फेमस आहे की वडापाव घेण्यासाठी लोकांची रांग तर लागतेच त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा देखील लोक वडापाव खात उभे असतात. एका वडापावची किंमत 20 रुपये असून दिवसाला पाच ते सहा हजार वडापावची रोज विक्री असते असं नायकू यांनी सांगितले.
advertisement
कांद्याची साल फेकून देण्यापूर्वी करा विचार, केसांसाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
सकाळी नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत हा वडापाव उपलब्ध असतो. त्याचबरोबर कुणाला घरपोच वडापाव हवा असेल तर स्विगी किंवा झोमॅटोवरूनही तुम्ही तो मागू शकतो. पुण्यात घरपोच हा वडापाव मिळत असला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो खाण्याची मजा काही औरच आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
50 वर्षांपासून प्रसिद्ध आहे पुण्यात हा वडापाव; एक खाल्ला तरी भागेल तुमची भूक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement