200 पेक्षा जास्त आजारांवर आहे गुणकारी; अशी पाणीपुरी तुम्ही कधी खाल्लीये का?

Last Updated:

तुम्हाला आवडणारी ही पाणीपुरी आता आयुर्वेदीक पद्धतीनं बनवली जात असून ती 200 पेक्षा जास्त आजारांवर उपायकारक आहे.

News18
News18
नाशिक, 22 सप्टेंबर : पाणीपुरी खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे प्रत्येक शहरात आपल्याला वेगवेगळ्या भागात पाणीपुरी मिळते. ज्या ठिकाणी पाणीपुरी फेमस असते तिथे त्यामुळे खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. जर तुम्हाला आवडणारी ही पाणीपुरी आता आयुर्वेदीक पद्धतीनं बनवली जात असून ती 200 पेक्षा जास्त आजारांवर उपायकारक आहे, असं तुम्हाला सांगितलं तर... खवय्याचं शहर असलेल्या नाशिक या पद्धतीची पाणीपुरी मिळत आहे, असा दावा पाणीपुरी चालकानं केला आहे.
नाशिकमधील राणेनगर परिसरात दत्तू शेळके यांनी झोंब्लास्टिक आयुर्वेदीक पाणीपुरी सुरू केली आहे. ही पाणीपुरी औषधी असल्याचा शेळके यांचा दावा आहे. 'प्रत्येक गल्लीबोळात पाणीपुरी मिळते. पण, आपण वेगळ्या टेस्टची आणि आयुर्वेदीक पाणीपुरी द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी मी खास रिसर्च केला. तुळस,अवळा,कडुनिंब, हारडा,हिंग, कळोजी,पिंपळी यासारख्या 42 वस्तूंता वार मी यामध्ये मी वापल्या आहेत. आमची ही हायजेनिक पाणीपुरी खाण्यासाठी अनेक जण दररोज हजेरी लावतात,' अशी प्रतिक्रिया शेळके यांनी दिली.
advertisement
काय होतो फायदा?
तुळस : यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते, सर्दी,खोकला जातो.आपल्या तोंडाचा येणारा दुर्गंध वास कमी होतो,तसेच कॅन्सरवर देखील तुळस उपायकारक आहे.
ओवा :  कफ,पित्त, ओमेटिंग होत नाही तसेच वजन कमी करण्यास मदत होते.पचनशक्ती वाढते.
advertisement
खजूर : हे शरीरासाठी चांगल असत,यामुळे कॅल्शियम वाढत,तसेच दाताना कीड लागत नाही हे फायदे आहेत.
पिपली : हे देखील शरीरासाठी चांगल असत,श्वास मोकळा होतो,खोकला बंद होतो,तसेच मलेरियावर देखील उपायकारक आहे.
कुठे खाणार आयुर्वेदिक पाणीपुरी?
नाशिक शहरातील राणेनगर बोगद्या जवळील स्टेट बँक खाऊगल्ली परिसरात ही पाणीपुरी आहे,दत्तू शेळके हा पाणीपुरी स्टॉल चालवतात.
view comments
मराठी बातम्या/Food/
200 पेक्षा जास्त आजारांवर आहे गुणकारी; अशी पाणीपुरी तुम्ही कधी खाल्लीये का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement