TRENDING:

मुंबईकर काय खातील नेम नाही! चक्क वेफर्स खायला लागतायेत रांगा, किंमत 79 रुपयांपासून..., Video

Last Updated:

Mumbai Food: चव, कुरकुरीतपणा, रंगतदार सादरीकरण आणि परवडणारी किंमत यामुळे हा वेफर्स-आधारित फ्यूजन पदार्थ लोकप्रिय ठरत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईची खाद्यसंस्कृती म्हटलं की जगभरातील विविध पदार्थांचं मिश्रण आढळतं. रामनारायण रुईया कॉलेज परिसरात सध्या एका हटके आणि चविष्ट स्ट्रीट फूडची जोरदार चर्चा आहे. पारंपरिक वेफर्सला दिलेला ट्रेंडी आणि हेल्दी ट्विस्ट तरुणाईला अक्षरश: भुरळ घालत आहे. संध्याकाळी सुरू होणाऱ्या या स्टॉलवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसते. त्यामागचं कारण म्हणजे कुरकुरीतपणा, विविध सॉसेसचा संगम आणि ताज्या भाज्यांची भरघोस टॉपिंग. याचबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

या खास डिशची सुरुवात होते ती खुसखुशीत, कुरकुरीत वेफर्सपासून. त्यावर मेयोनीजचा क्रीमी थर, पेरिपेरी सॉसची हलकी तिखट चव, बार्बिक्यू सॉसचा स्मोकी फ्लेवर, मिंट मायोची ताजगी आणि चीज सॉसची रिचनेस असा चवींचा जबरदस्त मेळ घातला जातो. प्रत्येक सॉस वेगवेगळा स्वाद देत असला तरी एकत्र आल्यावर तयार होणारा फ्लेवर विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट इव्हनिंग स्नॅक ठरतो.

advertisement

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ, पारंपरिक सांज्याची पोळी, रेसिपीचा Video

फक्त सॉसच नव्हे तर या डिशची खरी खासियत म्हणजे त्यावरील ताज्या भाज्यांचे रंगीत टॉपिंग. बारीक चिरलेला कांदा, रसाळ टोमॅटो, कुरकुरीत कोबी, गोडसर स्वीट कॉर्न आणि ढोबळी मिरची यामुळे पदार्थाला चव आणि टेक्स्चर दोन्ही मिळते. त्यामुळे हा पदार्थ केवळ जंक फूड न राहता एक हेल्दी स्ट्रीट फूड पर्याय बनतो.

advertisement

मेन्यूची सुरुवात 79 रुपयांपासून होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी तो सहज परवडणारा आहे. ‘ग्रीन मोड’मध्ये भाज्यांचा जास्त वापर करून हलका आणि फ्रेश पर्याय दिला जातो. ‘पॉवर कपल’मध्ये चीज आणि सॉसेसचा डबल डोस असतो, तर ‘प्रोटीन वाइब’मध्ये प्रोटीनयुक्त घटकांचा समावेश करून फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांसाठी खास पर्याय तयार करण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक प्रकाराखाली अनेक कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात
सर्व पहा

चव, कुरकुरीतपणा, रंगतदार सादरीकरण आणि परवडणारी किंमत यामुळे हा वेफर्स-आधारित फ्यूजन पदार्थ माटुंगा परिसरात सध्या ट्रेंडिंग फूड ठरला आहे. संध्याकाळच्या भुकेसाठी हा पर्याय तरुणाईचा फेव्हरेट बनला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
मुंबईकर काय खातील नेम नाही! चक्क वेफर्स खायला लागतायेत रांगा, किंमत 79 रुपयांपासून..., Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल