संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे 'ही' कुरकीत जिलेबी, पाहूनच आवरणार नाही मोह
हातगाडीवर सुरू झालं होतं ज्यूस सेंटर
नाशिक शहरातील रविवार कारंजा, चांदीचा गणपती या परिसरातील समर्थ ज्यूस सेंटरला नाशिक शहरातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 1958 साली प्रभाकर शेवाळे यांनी समर्थ ज्यूस सेंटर एका हातगाडीवर सुरू केलं. सुरुवातीच्या काळात प्रभाकर शेवाळे हे त्या हातगाडीवर अननसाचा रस विकत होते. 65 वर्षांपूर्वी ते एक आणा या किमतीत अननसाचा रस विकत होते. कालांतराने त्या ज्यूसला मागणी वाढत गेली. हात गाडीचा हा प्रवास आता चार वेगवेगळ्या शाखांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये समर्थ ज्यूस सेंटर सामील झाले आहे.
advertisement
कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं
अननसाच्या ज्यूसला मोठी मागणी
या ठिकाणी वेगवेगळ्या फळांचा ज्यूस उपलब्ध आहे. परंतु येथील अननस ज्यूसला विशेष मागणी आहे. येथे अननस ज्यूस हा पायनापल आईस्क्रीम सोबत फुल ग्लास सर्व्ह केला जातो. विशेष म्हणजे या ज्युस सेंटरमध्ये एक खास स्वयंचलित मशिन असून त्यामधून एकाच वेळी 10 ते 12 ग्लास ज्युस मिळतो. या ज्यूस ची किंमत 45 रुपये एवढी आहे. वाजवी दरात मिळणाऱ्या ज्यूसचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून येतात, अशी माहिती शेवाळे देतात.