TRENDING:

नवरात्रीच्या उपवासाला 5 मिनिटात बनवा भगर आणि साबुदाण्याचा डोसा; पाहा रेसिपी पद्धत Video

Last Updated:

नवरात्रीच्या उपवासासाठी भगर आणि साबुदाण्याचा डोसा अगदी 5 मिनिटात बनवून तयार करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 6 ऑक्टोबर : सण, उत्सव म्हंटलं की उपवास आणि व्रतवैकल्य आलीच. त्यातचं नवरात्री जवळ येऊन ठेपली आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केले जातात. त्यामुळे  उपवासाच्या दिवशी फराळाला काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यात काहीतरी नवीन डिश बनविण्याची इच्छा घरची मंडळी व्यक्त करतात. अशावेळी तुम्ही भगर आणि साबुदाण्याचा डोसा अगदी 5 मिनिटात बनवून तयार करू शकता. वर्धा येथील गृहिणी अरुणा घोंग यांनी हि रेसिपी सांगितली आहे.
advertisement

भगर आणि साबुदाणा डोसा साहित्य :

1)  अर्धी वाटी साबुदाणा

2) एक वाटी भगर

3) अर्धी वाटी शेंगदाणे

4) 4-5 हिरव्या मिरच्या

5) कढीपत्ता

6) सैंधव मीठ

7) मिरेपूड

8) गोड दही

(तुमच्या गरजेनुसार साहित्याचेप्रमाण कमी जास्त करता येईल)

नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी का फुंकतात घागरी? पाहा काय आहे महत्त्व Video

advertisement

कसा बनवायचा भगर आणि साबुदाणा डोसा?

सर्वप्रथम भगर आणि साबुदाणा आणि शेंगदाणे एकत्र करून धुवून घ्या. भिजत ठेवा. भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले भगर, साबुदाणा आणि शेंगदाणे तसेच हिरव्या मिरच्या ऍड करा चांगलं बारीक करून घ्या. घट्ट ते पातळ असं मिश्रण तयार होईल इतकच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला नॉनस्टिक तवाच वापरायचा आहे जेणेकरून हा डोसा तुटणार किंवा चिकटणार नाही. हे मिश्रण तव्यावर चांगले पसरून घ्या थोड्या वेळाने डोसा कोरडा पडत असेल तर डोस्यावर तेल-पाणी शिंपडू शकता. दोन्ही बाजूने परतून घेतल्यानंतर आपल्या आवडत्या उपवासाच्या चटणीसोबत खाण्यासाठी डोसा तयार आहे.

advertisement

दही चटणी कशी बनवाल?

तडक्यासाठी एका भांड्यात गरम तेलात जिरे, कढीपत्ता,तोडून हिरव्या मिरच्या आणि मिरेपूड ऍड करून हा तडका दह्यावर घाला. दह्यात थोडी साखर आणि मीठही ऍड करता येईल. डोसा सोबत खाण्यासाठी हि चविष्ट चटणी तयार आहे.

घरगुती पद्धतीनं बनवा कोष्टी डाळ-कांदा, विदर्भातील खास रेसिपी, Video

नक्की ट्राय करा रेसिपी 

advertisement

सामान्यतः डोसा हा इडलीच्या मिश्रणापासून बनतो, सर्वजण मोठ्या आवडीने डोसा खातात मात्र आता उपवासाच्या दिवशीही डोसा खाणं शक्य आहे. भगर आणि साबुदाणा पासून अगदी चविष्ट आणि 5 मिनिटात बनवून तयार होईल असा डोसा कधीही बनवू शकता. घरी सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून नवरात्रीच्या उपवसांसाठी ही चविष्ट आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
नवरात्रीच्या उपवासाला 5 मिनिटात बनवा भगर आणि साबुदाण्याचा डोसा; पाहा रेसिपी पद्धत Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल