या बेकरीला चार पिढ्यांचा पारंपरिक आणि कौटुंबिक वारसा लाभला आहे. अफेन काझी सांगतात, आम्ही सध्या या बेकरीची चौथ्या पिढी काम करत आहोत. आमचे आजोबा यांनी ही बेकरी सुरू केली होती, आणि आजही आम्ही त्याच चव आणि दर्जाची परंपरा जपत आहोत.
तुम्हाला माहितीये का शेगाव कचोरी फेमस कशी झाली? झणझणीत कचोरी मागचं गुपित नेमकं काय? Video
advertisement
न्यू एम्पायर बेकरीमध्ये दररोज 60 पेक्षा अधिक प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स तयार केले जातात. यामध्ये केक, बिस्कीट, ब्रेड, पिझ्झा बेस, नान अशा अनेक चविष्ट वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये नान हा त्यांचा विशेष प्रसिद्ध आणि मागणी असलेला पदार्थ आहे. केक आणि बिस्किटांचे देखील विविध प्रकार येथे तयार होतात. यामध्ये चॉकलेट, फ्रूट, प्लेन, क्रीम बेस्ड अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे.
या बेकरीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व प्रॉडक्ट्स हे स्वतः तयार केले जातात, कोणत्याही प्रकारचा बाह्य माल वापरला जात नाही. त्यामुळेच येथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये घरगुती स्वादाची चव जाणवते. पुण्यातील कॅम्प परिसरातील ही सर्वात जुनी बेकरी आजही ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम मिळवत आपल्या वारशाला पुढे नेत आहेत.