पोहे आणि बेसनचा हा खास पदार्थ. पोहे आणि बेसन हे कॉम्बिनशेही कदाचित तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण यापासून बनलेला हा स्पेशल पदार्थ. एकदा का तुम्ही बनवाल तर तुम्ही नेहमी बनवाल. आता हा पदार्थ नेमका काय हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. आधी साहित्य पाहुयात.
Purnache Pohe Recipe : कधी खाल्लेत का पुरणाचे पोहे? कुठेही, कधीही शोधलंत तरी सापडणार नाही ही रेसिपी
advertisement
एक वाटी पोहे
एक वाटी बेसन
लाल तिखट
हळद
धने पावडर
चिकन मसाला किंवा मटण मसाला
बारीक चिरलेला कांदा
हिरवी मिरची
टोमॅटो
बारीक चिरलेली शिमला मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
तेल
पांढरे तीळ
बेकिंग सोडा
पाणी
पोहे आणि बेसनचा नवा पदार्थ
एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्या. पाणी काढून टाका. पोहे असेच भिजत ठेवा. आता दुसरं भांडं घ्या, त्यात बेसन पीठ घ्या, एक चमचा लाल तिखट, थोडी हळद, थोडी धने पावडर पाणी घालून मिश्रण बनवून घ्या. एकदम पाणी ओतू नका नाहीतर गुठळ्या होती. थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ आणि एकदम घट्टही नाही. मध्यम असं मिश्रण तयार करून घ्या.
आता बेसनचं मिश्रण भिजवलेल्या पोह्यांमध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या. सोबतच पोहे थोडे मॅशही करा. आता यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता यामध्ये चिकन किंवा मटण मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकून चांगलं एकत्र करा. सर्वात शेवटी थोडासा खायचा सोडा आणि थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता गॅसवर अप्पे पात्र ठेवून सगळ्या साच्यात तेल टाकून गरम करून घ्या. त्यात पांढरे तीळ आणि मग तयार केलेलं पोहे-बेसनचं मिश्रण टाका. मिश्रण भरताना आधी कडेने सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी टाकायचं. आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 3-4 मिनिटं वाफवून घ्या. नंतर झाकण काढून वरून तेल सोडून पलटवून घ्या.
हे तयार झाले पोह्याचे अप्पे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, नाश्ताच काय मुलांना टिफिनमध्येही तुम्ही हे देऊ शकता.
