गावाकडील शेतात बनवली जाणारी पोपटी तुम्ही घरात बनवू शकता तेसुद्धा कुकरमध्ये. कुकरमध्ये पोपटी, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कारण सामान्यपणे मातीच्या मडक्यात पोपटी बनवली जाते. पण आता ते शक्य नसेल तर तुम्ही घरात कुकरमध्येही पोपटी बनवू शकता. आता कशी ते पाहुयात.
साहित्य (तुमच्या गरजेनुसार आणि चवीनुसार)
पावटा किंवा वालाच्या शेंगा (तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा वापरू शकता जसं की तूर, मटार, राजमा)
advertisement
चिकन
अंडी
लाल तिखट (शक्यतो कांदा लसूण मसाला वापरा)
हळद
तेल
Jowar Recipe Video : बुंदीचा लाडू नाही, ही आहेत मुटगी; एक वेगळाच चमचमीत पण हेल्दी पदार्थ
ओवा
बारीक मीठ
खडं मीठ
भांबुर्डीचा पाला/ केळीची पानं आणि पुदिना/ मक्याच्या साली
तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार बटाटा, रताळंही टाकू शकता.
कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची?
सगळ्यात आधी चिकन नीट स्वच्छ धुवून घ्या. त्याला आलं लसूण पेस्ट, लाल मसाला, हळद, मीठ, लिंबू रस, तेल लावून अर्धा तास मॅरिनेट करून घ्या. इतर शेंगा आणि बटाटा घेणार असाल तर दोन्ही एकत्र करून त्याला लाल तिखट आणि मीठ, तेल लावून घ्या.
पोपटी म्हणजे भांबुर्डी पाला लागतो. पण तो सगळीकडे मिळेलच असं नाही. भांबुर्डी पाला नाही मिळाला तर तुम्ही तुम्ही केळ्याचं पान, मक्याच्या साली आणि पुदिना वापरू शकता. ही पानं कुकरच्या तळाला टाकायची आहे.
Kadhi Recipe Video : मडक्यातील चिपीची कढी, कधी टेस्ट केलीये का? आजी पणजीची जुनी रेसिपी
आता पानांवर आधी शेंगा टाका. त्यावर मका, अंडी, चिकनचा थर लावा. वरून थोडं खडं मीठ टाका. त्यावर पाला ठेवा. पुन्हा एकदा शेंगा वर मका, अंडी, चिकनचा लेअर लावा, मीठ टाका आणि पुन्हा वर पानं लावा. वरून हवं असेल तर ओवा टाका.
कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 6-7 शिट्ट्या करून घ्या. आता तुम्ही म्हणाल यात पाणी टाकलेलं नाही. तर चिकन शिजताना त्याला पाणी सुटतं. शिवाय मीठही टाकलं आहे. त्यामुळे त्याच्याच वाफेवर हे शिजेल. शिट्ट्या झाल्या की पोपटी गरमागरम काढा आणि लगेच खा.
कुकरमधील पोपटी कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
