रांची : आजकाल लोक फिटनेसच्या बाबतीत फार सिरीयस असतात, कारण आता साठीत जडणारे आजार अगदी विशीतच होऊ लागले आहेत. अशात केवळ नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळेच आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करू शकतो. अनेकजण दररोज भाकरी खातात. मात्र सुदृढ आरोग्यासाठी नेमकी कोणती भाकरी सर्वाधिक पौष्टिक असते माहितीये?
आहारतज्ज्ञ सांगतात, चपातीपेक्षा भाकरी खाणं उत्तम. कारण भाकरीचं पचन सहज होतं आणि त्यातून आरोग्याला विविध फायदे मिळतात. त्यातही नाचणीची भाकरी सर्वाधिक पौष्टिक मानली जाते.
advertisement
काय सांगतात डॉक्टर?
रांचीमधील आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे यांनी सांगितलं की, नाचणीची भाकरी आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरते. नाचणीत आयर्न भरपूर असतं. त्यामुळे महिलांसाठी ही भाकरी सर्वोत्तम मानली जाते. अगदी पीसीओडी, हिमोग्लोबिनची कमतरता, इत्यादी त्रासात आहारात नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
नाचणीची भाकरी किंवा लाडू आपण खाऊ शकता. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास काहीच दिवसांत शरिरात फरक दिसू शकतो. जर रात्रीच्या जेवणात नाचणीची भाकरी खाल्ली तर सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं. शिवाय सगळा आळस दूर होऊन शरीर ऊर्जावान राहतं.
