तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर दूध (संपूर्ण फॅटचे असल्यास चव अधिक छान येते), 1/4 कप शिजवून घेतलेला बासमती किंवा सुगंधी तांदूळ, 1/2 कप साखर किंवा चवीनुसार, 1/2 चमचा वेलदोडा पावडर, 5 ते 6 केशर (ऐच्छिक), तुपात भाजलेले काजू, बदाम आणि मनुके, 2 चमचे साजूक तूप
Modak Recipe: 5 ते 7 मिनिटांत बनवा 'नो कूक मोदक'! बाप्पाच्या नैवेद्याचा सुटेल प्रश्न
advertisement
कृती
सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात काजू, बदाम व मनुका सौम्य गुलाबी होईपर्यंत परतून घ्या व बाजूला काढा. त्याच पातेल्यात दूध टाका. दूध उकळू लागल्यावर गॅस मध्यम करा. मध्यम आचेवर दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून तळाला लागणार नाही. मग त्यात शिजवलेले तांदूळ टाका. 10 ते 15 मिनिटांत तांदूळ एकदम मऊ होऊ लागतील. आता त्यात साखर घाला व पुन्हा 5 मिनिटे शिजवा. साखर विरघळल्यानंतर खीर नीट ढवळून पुन्हा 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. खीर थोडी घट्टसर झाली की गॅस बंद करा. त्यात परतलेला सुका मेवा आणि केशर टाकून गार्निशिंग करून घ्या. खीर गरम असताना किंवा थोडी थंड करून नैवेद्य ठेवा. दोन्ही पद्धतीने खीर उत्तम लागते.
विशेष टिप: खीर गोडसर लागावी यासाठी साखर शेवटी टाकल्यास चव अधिक चांगली येते. दूध सतत ढवळणे आवश्यक, नाहीतर तळाला लागू शकते.





