तिळगूळ लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- साधा गूळ
- पॉलिश नसलेले तीळ
- घरचं साजूक तूप
- भाजलेले शेंगदाणे
- वेलचीपूड
तिळगूळ लाडू बनवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम एका पॅनमध्ये मंद आचेवर तीळ भाजून घ्या. तिळाचा रंग सोनेरी होईपर्यंत ते भाजा. तिळ तडतडायला लागले की समजून जा ते भाजले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या. यानंतर शेंगदाने मिक्सरमध्ये वाटून घ्या. तिळ थंड झाल्यानंतर त्यातील एक वाटी तिळ वेगळे काढून घ्या आणि उरलेले सर्व तिळ मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. तिळ वाटून घेताना मिक्सर चालू बंद करत राहा. सलग चालू ठेवल्यास त्यातून तेल सुटू शकतं.
advertisement
आता तीळ पावडर, गूळ, तूप आणि वेलची पावडर हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्या. यानंतर त्यात शेंगदाण्याची तयार केलेली पावडर घाला. यानंतर सुरुवातीला बाजुला काढून ठेवलेले भाजलेले तिळ त्यात घाला. आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आणि त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बांधून घ्या आणि त्यांचा अस्वाद घ्या. हे लाडू महिनाभर टिकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
