TRENDING:

Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!

Last Updated:

टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय मायक्रो SUV Tata Punch 2026 Facelift आज अधिकृतपणे लॉन्च केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय मायक्रो SUV Tata Punch 2026 Facelift आज अधिकृतपणे लॉन्च केली आहे. सुरक्षितता, परवडणारी किंमत आणि मजबूत बांधणी यासाठी ओळखली जाणारी Tata Punch आता नव्या लुकमध्ये आणि अधिक आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसमोर आली आहे. आजपासून म्हणजेच 13 जानेवारी 2026 पासून या गाडीची बुकिंग सुरू झाली असून, सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.59 लाख ठेवण्यात आली आहे.
advertisement

नव्या Tata Punch Facelift मध्ये सर्वात आधी लक्ष वेधून घेणारा बदल म्हणजे तिचा अधिक Bold आणि Assertive डिझाईन. फ्रेश एक्सटेरियर, पॉवरसाइट LED हेडलॅम्प्स, शार्प फ्रंट प्रोफाइल आणि SUV-स्टाइल क्लॅडिंग यामुळे गाडी अधिक मजबूत आणि प्रीमियम दिसते. ही SUV Cyantif, Caramel, Bengal Rough आणि Coorg Clouds अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, हे रंग तरुण तसेच कुटुंबांसाठीही तितकेच आकर्षक ठरतात.

advertisement

फीचर्सच्या बाबतीत Tata Punch 2026 ही सेगमेंटमध्ये स्वतःला वेगळ्या उंचीवर नेणारी गाडी ठरते. गाडीमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री HD सराउंड व्ह्यू कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM, स्मार्ट स्टीयरिंग व्हील आणि प्रीमियम इंटीरियर देण्यात आले आहे. यामुळे रोजच्या वापरात ही SUV अधिक आरामदायी आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बनते.

advertisement

Maruti आता विसरा, Tata चा मोठा धमाका, टँकसारखी दणकट नवी Punch आली, किंमतही कमी

या गाडीचं एक मोठं वेगळेपण म्हणजे इंजिन आणि ट्रान्समिशनचे पर्याय. Tata Punch 2026 मध्ये 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि वेगवान तसेच स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते. याशिवाय टाटा मोटर्सने शहरातील ट्रॅफिक लक्षात घेऊन मोठा बदल केला आहे.

advertisement

Tata Punch ही भारताची पहिली SUV ठरली आहे जी CNG सोबत AMT (Automated Manual Transmission) पर्याय देत आहे. यामुळे शहरांमध्ये सतत ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना क्लच आणि गिअर बदलण्याचा त्रास राहत नाही. ही सुविधा खास करून शहरी भागातील ग्राहकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. पॅडल शिफ्टर आणि CNG AMT शिफ्टरमुळे ड्रायव्हिंग आणखी सोपे आणि आरामदायी होते.

advertisement

सुरक्षिततेच्या बाबतीत Tata Punch 2026 Facelift ने पुन्हा एकदा टाटा मोटर्सची ओळख अधोरेखित केली आहे. या गाडीला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. अपघाताच्या वेळी पॅसेंजर सेल सुरक्षित राहतो, सर्व दरवाजे अनलॉक होतात आणि फ्युएल सिस्टीम सील राहते. गाडीत 6 एअरबॅग्स, Electronic Stability Program (ESP), ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, हिल होल्ड असिस्ट, सीट बेल्ट रिमाइंडर यासारखी अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.

खराब रस्ते आणि पावसाळी परिस्थिती लक्षात घेता Tata Punch Facelift ही SUV अत्यंत सक्षम आहे. 193 मिमी ग्राउंड क्लीअरन्स, 400 मिमी वॉटर वेडिंग कॅपॅसिटी आणि चढ चढण्याची उत्तम क्षमता यामुळे ही गाडी ग्रामीण तसेच शहरी भागात सहज चालवता येते. याच कारणामुळे 2024 मध्ये Tata Punch ही भारतामधील सर्वात वेगाने विकली जाणारी SUV ठरली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!
सर्व पहा

एकूणच, Tata Punch 2026 Facelift ही केवळ एक फेसलिफ्ट नसून, सुरक्षितता, परवडणारी किंमत, आधुनिक फीचर्स आणि नावीन्यपूर्ण AMT–CNG टेक्नॉलॉजी यांचा उत्कृष्ट संगम आहे. ₹5.59 लाखांपासून सुरू होणारी किंमत, 5-स्टार सेफ्टी रेटिंग आणि शहरासाठी उपयुक्त ऑटोमेटेड ट्रान्समिशन यामुळे नवी Tata Punch भारतीय SUV बाजारात पुन्हा एकदा आपली मजबूत पकड सिद्ध करणार आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल