ट्रॅफिक चालान न भरल्यास RC सह ड्रायव्हिंग लायसेन्स होऊ शकतं रद्द! वाचा हे नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
New Motor Vehicle Rules: नवीन मोटर वाहन नियमांअंतर्गत ट्रॅफिक चालान न भरल्यास RC रद्द आणि ड्रायव्हिंग लायसेन्स सस्पेंड होऊ शकतो. चला नियम सविस्तर जाणून घेऊया.
सरकार आता ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने मोटर वाहन नियमांमध्ये बदलाचा ड्राफ्ट तयार केला आहे. ज्या अंतर्गत कोणताही वाहन मालक ट्रॅफिक चालान भरला नाही तर त्याच्या गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC रद्द केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर ड्रायव्हिंग लायसेन्सलाही सस्पेंड केले जाऊ शकते. याचा उद्देश जे लोक वारंवार नियम तोडतात त्यांच्यावर कारवाई करणे आहे.
advertisement
चलन मिळाल्यानंतर तुम्हाला किती दिवसांचा कालावधी मिळेल? : नवीन नियमांनुसार, वाहन मालकांना वाहतूक चलन मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागेल. या काळात, त्यांना दंड भरावा लागेल किंवा पुराव्यासह चलनाला विरोध करावा लागेल. 15 दिवसांच्या आत हाताने किंवा 3 दिवसांच्या आत ऑनलाइन चलन पाठवले जाईल. पैसे दिले गेले नाहीत किंवा निर्धारित वेळेत आक्षेप दाखल केला गेला नाही तर चलन आपोआप स्वीकारले जाईल.
advertisement
पैसे भरले नाहीत तर काय होईल? : चलन थकले असेल, तर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) त्या व्यक्तीशी संबंधित कोणतेही काम करणार नाही. अशा व्यक्तींना वाहन आणि सारथी पोर्टलवर "नो ट्रान्झॅक्शन" स्थितीत ठेवले जाईल. याचा अर्थ असा की चलन मंजूर होईपर्यंत आरसी ट्रान्सफर, परवाना नूतनीकरण किंवा इतर सेवा उपलब्ध होणार नाहीत.
advertisement
RC ब्लॅकलिस्ट आणि लायसेन्स सस्पेंडचा धोका : एखाद्या वाहनावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त चलन थकबाकी आहे तर त्याची RC ब्लॅकलिस्ट केली जाऊ शकते. अशा गाड्यांना रस्त्यांवर चालवणे बेकायदेशीर मानले जाईल. या व्यतिरिक्त तीन महिन्यांपर्यंत ई-चालान न भरल्यास ड्रायव्हिंग लायसेन्सही सस्पेंड केला जाऊ शकतो. एका वर्षात रेड लाइट तोडल्यास किंवा हानिकारक ड्रायव्हिंगचे तीन पेक्षा जास्त चालान झाल्यास लायसेन्स कमीत कमी तीन महिन्यासाठी जब्त होऊ शकतो.
advertisement
advertisement








