Knee Pain : गुडघ्यांमधल्या वेदनांवर या उपायांनी करा मात, गुडघे दुखीचा त्रास होईल कमी, वाचा योगगुरुंचा सल्ला

Last Updated:

गुडघेदुखी केवळ गुडघ्यांमुळेच होत नाही तर मांड्या आणि कंबरेतील कमकुवत स्नायू, रक्ताभिसरण बिघडणं आणि शरीरात कडकपणा यामुळे देखील होते. योगासनं आणि काही सोप्या सवयींमुळे या वेदनांपासून आराम मिळू शकतो.

News18
News18
मुंबई : वय, आजार, थकवा अशा विविध कारणांमुळे पाय दुखण्याचं प्रमाण वाढतं. तसंच अनेकांना धावपळीमुळे, गुडघेदुखीचा त्रासही जाणवू शकतो. ही समस्या पूर्वी वयोमानानुसार जाणवत होती, पण आता ती तरुणांमधेही जाणवते आहे.
जास्त वेळ बसणं, स्नायू कमकुवत होणं, चुकीच्या सवयी आणि शरीरात जाणवणारा ताठरपणा अशा विविध कारणांमुळे गुडघेदुखीचा त्रास वाढतो. काहीवेळा वेदना तीव्र असतात तेव्हा चालणं देखील कठीण होतं.
गुडघेदुखी केवळ गुडघ्यांमुळेच होत नाही तर मांड्या आणि कंबरेतील कमकुवत स्नायू, रक्ताभिसरण बिघडणं आणि शरीरात कडकपणा यामुळे देखील होते. योगासनं आणि काही सोप्या सवयींमुळे या वेदनांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
हालचाली करत राहा - हलक्या आणि सुरक्षित योगासनांनी सुरुवात करा. पाय एकत्र करून, गुडघे थोडे पुढे वाकवा आणि तळवे गुडघ्यांवर ठेवा. आता, या स्थितीत, गुडघे आधी वर्तुळाकार फिरवा, प्रथम घड्याळाच्या दिशेनं आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेनं फिरवा. यानंतर, गुडघे वाकवून सरळ करण्याचा सराव करा. यामुळे सांध्यातील हालचाल वाढते आणि गुडघ्यांमधला कडकपणा कमी होतो.
advertisement
स्नायूंची बळकटी - स्नायू मजबूत करण्यासाठी, जमिनीवर सरळ बसा, मांड्या आत खेचा आणि हळूहळू मोकळ्या करा. तसंच, एका वेळी एक पाय वाकवून सरळ करण्याचा सराव केल्यानं देखील मदत होते. या सोप्या योगासनांनी गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे वेदना हळूहळू कमी होतात.
व्यायामांव्यतिरिक्त या गोष्टीही लक्षात ठेवा -
योगासनांसोबतच, जीवनशैली आणि सवयींमधे काही बदल करणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
गुडघे टेकून जास्त वेळ बसणं टाळा.
दर तीस-चाळीस मिनिटांनी थोडं चालत जा.
सराव करताना, शरीराला वेदना होणार नाहीत याची काळजी घ्या.
वजन जास्त असल्यानंही गुडघेदुखी होऊ शकते. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव पडतो.
advertisement
चांगल्या कुशनिंगसह योग्य पादत्राणं घाला, कारण यामुळे गुडघ्यांवरचा ताण कमी होतो.
या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर, नैसर्गिकरित्या गुडघेदुखीपासून आराम मिळवू शकाल, पण वेदना असह्य असतील तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Knee Pain : गुडघ्यांमधल्या वेदनांवर या उपायांनी करा मात, गुडघे दुखीचा त्रास होईल कमी, वाचा योगगुरुंचा सल्ला
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement