Diet Tips : पदार्थ आवडला म्हणून भरपूर खाताय ? पोटावर येईल ताण, तब्येतीचं होईल नुकसान, शरीरावर होतात असे दुष्परिणाम

Last Updated:

भूक लागलेली नसतानाही सारखं खाणं तब्येतीसाठी धोकादायक ठरु शकतं. केवळ चवीसाठी आवडेल ते खात असाल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात. चविष्ट अन्नामुळे बहुतेकदा वजन वाढतं. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्या की लठ्ठपणा वाढतो हे नक्की. हे टाळण्यासाठी, काही गोष्टी करणं तुमच्या हातात आहेत. 

News18
News18
मुंबई : आपण काय खातो यावर अवलंबून असतं आपलं वजन आणि एकूण आरोग्य. अनेकदा, चवीसाठी आपण आपल्या ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न भरतो. त्यावेळी इतक्या अन्नाची शरीराला गरज नसते.
भूक लागलेली नसतानाही सारखं खाणं तब्येतीसाठी धोकादायक ठरु शकतं. केवळ चवीसाठी आवडेल ते खात असाल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात. चविष्ट अन्नामुळे बहुतेकदा वजन वाढतं. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्या की लठ्ठपणा वाढतो हे नक्की. हे टाळण्यासाठी, काही गोष्टी करणं तुमच्या हातात आहेत.
advertisement
शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी, कार्बोहायड्रेट आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी एखाद्याने पातळ प्रथिने आणि कमी स्टार्चयुक्त भाज्या खाव्यात.
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम - जास्त खाण्याची सवयीमुळे हृदयाच्या आरोग्याची हानी होऊ शकते. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, रक्तदाबावरही याचा परिणाम होऊ शकतो.
पोटाशी संबंधित समस्या - जास्त खाल्ल्यानं पोटावर दबाव पडतो, ज्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं आवडतं, ज्यामुळे पचनावर परिणाम होतो.
advertisement
मेंदूच्या कार्यावर परिणाम - तणाव असेल तेव्हा अनेकदा गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं जातं. जे केवळ पोटासाठीच नाही तर मेंदूसाठीही हानिकारक ठरू शकतं. जास्त खाल्लं तर त्यामुळे वजन वाढतं, स्मरणशक्तीही कमजोर होऊ शकते.
झोपेवर परिणाम - काहींना जास्त खाल्ल्यानंतर थकवा जाणवतो. याचं प्रमुख कारण रिॲक्टिव्ह हायपोग्लाइसेमिया आहे, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खाल्ल्यानंतर लगेच कमी होते. त्यामुळे निद्रानाश, आळस, हृदयाचे ठोके जलद होणं आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
advertisement
उलट्या आणि मळमळ होणं - जास्त प्रमाणात खाल्ल्यानं उलट्या, मळमळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, अस्वस्थ वाटू शकतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet Tips : पदार्थ आवडला म्हणून भरपूर खाताय ? पोटावर येईल ताण, तब्येतीचं होईल नुकसान, शरीरावर होतात असे दुष्परिणाम
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement