2 तास 16 मिनिटांची ही फिल्म गाजवतेय Netflix, थरारक सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत ठेवतोय खिळवून
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Movies : नेटफ्लिक्सवरील एक फिल्म गेल्या काही दिवसांपासून ट्रेडिंगमध्ये आहे. या फिल्ममधील थरारक सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतोय.
advertisement
advertisement
advertisement
'रात अकेली है: द बंसल मर्डर्स' या फिल्मची कथा उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात घडते, जिथे शहरातील अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली बंसल कुटुंबाच्या घरी एक भयानक घटना घडते. कथेची सुरुवातच धक्का देणाऱ्या दृश्याने होते. एका आलिशान हवेलीमध्ये एकाच रात्री कुटुंबातील सहा सदस्यांची निर्दयपणे हत्या होते. ही एखादी साधी मर्डर केस नसते.
advertisement
तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे स्पष्ट होते की या हत्यांमागे जुन्या वैरभावना, कौटुंबिक लालसा आणि दडलेली खोल गुपिते आहेत. हवेलीच्या भिंतींमध्ये केवळ संपत्ती आणि ऐश्वर्यच नाही, तर वर्षानुवर्षे दडलेली भीती, मत्सर आणि द्वेषही कैद आहेत. प्रत्येक पात्र काहीतरी लपवत आहे आणि कोणीही पूर्णपणे निर्दोष वाटत नाही. चित्रपट हळूहळू एका साध्या मर्डर मिस्ट्रीमधून बाहेर येत डार्क सायकोलॉजिकल थ्रिलरचे रूप घेतो, जिथे सत्य आणि असत्य यांच्यातील रेषा अधिकाधिक धूसर होत जाते.
advertisement
गुंतागुंतीच्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जटिल यादव यांच्याकडे दिला जातो. हे पात्र नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारले आहे. जटिल यादव हा असा पोलीस अधिकारी आहे जो स्वतःच्या वैयक्तिक असुरक्षितता आणि सामाजिक दबावांशी झुंज देत असतो, पण गुन्ह्याच्या बारकाव्यांचा वेध घेण्यात पटाईत आहे. नवाजुद्दीन या भूमिकेत पूर्णपणे मिसळून गेलेले दिसतात आणि प्रत्येक दृश्यात आपली ठसा उमटवतात. चित्रपटाची स्टारकास्ट ही त्याची आणखी एक मोठी ताकद आहे. नवाजुद्दीनसोबत राधिका आपटे, चित्रांगदा सिंह, संजय कपूर आणि रजत कपूर यांसारखे अनुभवी कलाकार आहेत. तसेच इला अरुण, रेवती आणि दीप्ती नवल यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्री कथेला आणखी खोली देतात. विशेष म्हणजे प्रत्येक पात्र संशयाच्या कक्षेत आहे, त्यामुळे प्रेक्षक सतत संभ्रम आणि सस्पेन्समध्ये अडकून राहतात.
advertisement
'रात अकेली है: द बंसल मर्डर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केले आहे. कोणत्याही थ्रिलरची खरी कसोटी त्याचा क्लायमॅक्स असतो, आणि ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ या कसोटीवर पूर्णपणे उतरते. चित्रपटाचा शेवट धक्कादायक आणि पूर्णपणे अनपेक्षित आहे. जेव्हा खऱ्या खुनीचा पर्दाफाश होतो, तेव्हा कथेत विखुरलेले सगळे तुकडे एकत्र जुळून येतात. IMDb वर या चित्रपटाला 6.9 अशी रेटिंग मिळाली आहे.









