Intermittent Fasting : इंटरमीटंट फास्टिंग करताय ? आधी या टिप्स वाचा, वजन कमी करण्याच्या नादात प्रकृतीची हेळसांड नको
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
इंटरमीटंट फास्टिंगचे फायदे अनेक असले तरी शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होत असतात, ज्यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. इंटरमीटंट फास्टिंगच्या आधी या गोष्टी लक्षात ठेवा. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुंबई : इंटरमीटंट फास्टिंग हा शब्द घराघरात ऐकायला मिळतो. फिटनेस आणि वजन कमी करण्यासाठी इंटरमीटंट फास्टिंगचा वापर वाढलाय. इंटरमीटंट फास्टिंग म्हणजे काही तासांच्या अंतरानं जेवणं.
जगभरात इंटरमीटंट फास्टिंग वापरलं जातंय. इंटरमीटंट फास्टिंगचे डाएट प्लानही आहेत. सतत काही तास उपवास करणं आणि नंतर ठराविक वेळेत अन्न खाणं असं याचं स्वरुप आहे. यामुळे वजन कमी होणं आणि चयापचय सुधारणं असे अनेक फायदे आहेत.
इंटरमीटंट फास्टिंगचे फायदे अनेक असले तरी शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होत असतात, ज्यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. इंटरमीटंट फास्टिंगच्या आधी या गोष्टी लक्षात ठेवा. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
पचनाच्या समस्या - दीर्घकाळ उपवास करणं आणि नंतर अचानक खूप जड अन्न खाल्ल्यानं अतिसार, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
थकवा आणि चिडचिड - शरीराला वेळेवर कॅलरीज मिळत नाहीत, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी घसरते.
advertisement
यामुळे थकवा, चक्कर येणं, डोकं दुखणं आणि हँगरी म्हणजेच भुकेमुळे राग येणं असं वाटू शकतं.
ईटिंग डिसऑर्डर - ईटिंग डिसऑर्डर असलेल्यांसाठी इंटरमीटंट फास्टिंग धोकादायक असू शकतं. एखाद्या व्यक्तीला फास्टिंगनंतर जास्त प्रमाणात खाण्याची सवय लागू शकते.
हार्मोनल असंतुलन - महिलांमधे इंटरमीटंट फास्टिंग केल्यानं मासिक पाळीवर परिणाम होतो. यामुळे तणाव संप्रेरक देखील वाढू शकतं.
advertisement
झोपेचा अभाव - काहींना रिकाम्या पोटी झोप लागणं कठीण होतं, यामुळे दिवसभर सुस्ती येऊ शकते.
इंटरमीटंट फास्टिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? -
हायड्रेशन - दिवसभर भरपूर पाणी प्या. साखरेशिवाय ब्लॅक कॉफी, हर्बल टी किंवा लिंबू पाणी देखील घेऊ शकता.
पौष्टिक अन्न - 'इटिंग विंडो' दरम्यान म्हणजेच ज्या वेळी तुम्ही जेवू शकता त्या वेळी जंक फूड खाण्याची चूक करू नका. आहारात प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि फायबर असलेल्या भाज्यांचा समावेश करा, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळेल.
advertisement
हळू हळू सुरू करा - सुरुवातीलाच 16-18 तास इंटरमीटंट फास्टिंग करू नका. प्रथम 12 तासांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा.
शरीराचं ऐका - खूप अशक्तपणा, चक्कर येत असेल किंवा अशक्त वाटत असेल तर इंटरमीटंट फास्टिंग लगेच सोडा. शरीरावर जबरदस्ती दबाव टाकणं हानिकारक असू शकतं.
advertisement
व्यायामाचा ताळमेळ - कसरत करणाऱ्यांनी इंटरमीटंट फास्टिंग आणि व्यायामासाठी योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे. व्यायामानंतरच अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
इंटरमीटंट फास्टिंग करणं कोणी टाळावं -
गर्भवती किंवा स्तनपान करणारी महिला.
मधुमेहाचे रुग्ण.
हृदयरोग किंवा कमी रक्तदाब असलेले रुग्ण
ज्या लोकांचे वजन सामान्यपेक्षा खूपच कमी आहे.
लहान मुलं आणि किशोरवयीन.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 7:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Intermittent Fasting : इंटरमीटंट फास्टिंग करताय ? आधी या टिप्स वाचा, वजन कमी करण्याच्या नादात प्रकृतीची हेळसांड नको











