Makar Sankranti 2026 : महिलांनो, संक्रांतीची खरेदी बाकीये? एकाच छतीखाली खरेदी करा वस्तू, पुण्यात इथं भरलंय प्रदर्शन
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज संक्रांतीनिमित्त मेश कडून प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
पुणे: येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज संक्रांतीनिमित्त मेश कडून प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वानासाठी लागणाऱ्या वस्तू, साड्या, ज्वेलरी तसेच भेटवस्तू खरेदीसाठी उपलब्ध असून संक्रांतीपूर्वी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन सिटी बँक पेठेतील म्हात्रे पुलाजवळ आयोजित करण्यात आले आहे.
संक्रांतीची खरेदी करा एकाच ठिकाणी...
मकर संक्रांतीला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. महिलांची संक्रांतीसाठीची खरेदी अजून बाकी असेल, तर आज संध्याकाळपर्यंत या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. येथे संक्रांतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात 200 रुपयांपासून विविध वस्तू उपलब्ध असून साड्या, ज्वेलरी, हॅन्डमेड वस्तू तसेच संक्रांतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करता येणार आहे. 200 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू येथे उपलब्ध असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
हे प्रदर्शन सिटी बँक पेठेतील म्हात्रे पुलाजवळ आयोजित करण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत खुले राहणार आहे. या ठिकाणी स्थानिक तसेच बाहेरील व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले असून संक्रांतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. महिलांसह कुटुंबीयांसाठीही येथे खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 7:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makar Sankranti 2026 : महिलांनो, संक्रांतीची खरेदी बाकीये? एकाच छतीखाली खरेदी करा वस्तू, पुण्यात इथं भरलंय प्रदर्शन










