Snoring : झोपेत घोरण्याचा त्रास होत असेल तर काय करायचं ? सोप्या युक्त्यांनी मिळवा आराम, वाचा सविस्तर माहिती

Last Updated:

घोरणं ही अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंदाजे 45 टक्के लोकांना जाणवणारी समस्या आहे. घोरणं कमी करण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत. असं असलं तरी, नैसर्गिक पद्धतींनी घोरणं नियंत्रित केलं जाऊ शकतं असं तज्ज्ञांना वाटतं. घोरण्याची समस्या वाढली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पाहूया तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय.

News18
News18
मुंबई : घोरणं ही अनेकांसाठी मोठी समस्या आहे. गाढ झोपेत असताना, घोरणं सुरु होतं. ही सामान्य समस्या वाटत असली तरी, आरोग्य तज्ज्ञ याबाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.
अनेकदा घोरणाऱ्या व्यक्तीला कळत नसेल, पण त्यांच्या शेजारी झोपणाऱ्यांसाठी घोरण्याचा आवाज खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि चिडचिड होते. काही वेळा, हे गंभीर आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं. ज्यांना सतत घोरण्याचा त्रास होतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एरवी जास्त थकल्यामुळे आणि हिवाळ्यात नाक बंद होणं, घसा खवखवणं आणि श्लेष्मा वाढणं यामुळे घोरण्याची शक्यता जास्त असते असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.
advertisement
घोरणं ही अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंदाजे 45 टक्के लोकांना जाणवणारी समस्या आहे. घोरणं कमी करण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत. असं असलं तरी, नैसर्गिक पद्धतींनी घोरणं नियंत्रित केलं जाऊ शकतं असं तज्ज्ञांना वाटतं. घोरण्याची समस्या वाढली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पाहूया तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय.
advertisement
झोपण्याच्या सवयी - घोरणं कमी करण्यासाठी, झोपण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाठीवर झोपल्यानं जीभ आणि टाळू एकत्र चिकटू शकतात, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे घोरणं आणखी वाढू शकतं. अशावेळी, कुशीवर झोपणं चांगलं. दिवसातून किमान सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे. झोपेच्या कमतरतेमुळे घशाच्या स्नायूंमधे समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घोरणं आणखी वाढू शकते.
advertisement
उशा स्वच्छ ठेवा - बरेच लोक त्यांच्या उशांबाबत निष्काळजी असतात, परंतु हे खूप धोकादायक आहे. उशांवर साचलेली धूळ, घाण आणि मृत पेशींमुळे ऍलर्जी आणि नाक बंद होऊ शकतं.
उशा उन्हात वाळवाव्यात आणि उशांचे कव्हर दर दोन आठवड्यांनी धुवावेत. झोपताना डोकं वर ठेवल्यानं श्वास घ्यायला आणि घोरणं कमी होण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Snoring : झोपेत घोरण्याचा त्रास होत असेल तर काय करायचं ? सोप्या युक्त्यांनी मिळवा आराम, वाचा सविस्तर माहिती
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement