Diabetes : नैसर्गिक प्रकाश आरोग्यासाठी का महत्त्वाचा असतो ? शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी प्रकाशाचा काही संबंध असतो का ?

Last Updated:

नैसर्गिक प्रकाशामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि चरबीचं ऑक्सिडेशन म्हणजे चरबी जळण्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे एकूण साखर संतुलन आणि ऊर्जा चयापचय सुधारते, तसंच मूड आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

News18
News18
मुंबई : सूर्यप्रकाशात जाणं, काही वेळतरी कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं शरीरासाठी महत्त्वाचं आहे.  तसंच दिवसभरात मिळणारा नैसर्गिक प्रकाश मधुमेहींसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या प्रकाशामुळे, व्हिटॅमिन डी निर्मिती, चयापचय आणि सर्कॅडियन रिदम म्हणजेचं शरीराचे अंतर्गत घड्याळ सुधारतं.
नैसर्गिक प्रकाशामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि चरबीचं ऑक्सिडेशन म्हणजे चरबी जळण्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे एकूण साखर संतुलन आणि ऊर्जा चयापचय सुधारते, तसंच मूड आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
यासंदर्भात संशोधन करण्यात आलं. यातल्या एका अभ्यासानुसार, दिवसातल्या नैसर्गिक प्रकाशामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह असलेल्यांचं ग्लायसेमिक नियंत्रण चांगलं मिळतं.
advertisement
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विद्यापीठ आणि नेदरलँड्समधील मास्ट्रिच विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला. जे मधुमेही रुग्ण नैसर्गिक प्रकाशात राहिले त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दिवसाच्या जास्त तासांपर्यंत सामान्य मर्यादेत राहिली आणि त्यांच्यात कमी चढ-उतार दिसून आले.
नैसर्गिक प्रकाशाचे फायदेशीर परिणाम -
याव्यतिरिक्त, त्यांच्या मेलाटोनिनची पातळी, संध्याकाळी थोडी जास्त होती आणि त्यांच्या चरबीच्या ऑक्सिडेटिव्ह चयापचयातही सुधारणा झाली. हा अभ्यास जर्नल सेल मेटाबोलिझममध्ये प्रकाशित झाला. या आजारानं ग्रस्त असलेल्यांवर नैसर्गिक प्रकाशाचा कसा उपयोग होतो याबाबतचा हा पहिला पुरावा आहे.
advertisement
सर्कॅडियन रिदममधील व्यत्ययाबाबतही अभ्यास करण्यात आला. पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तेरा जणांवर अभ्यास करण्यात आला. अभ्यासासाठी, टीमने पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या तेरा जणांची निवड केली, ज्यांना टाइप 2 मधुमेह होता. या सगळ्यांना 4.5 दिवस खास डिझाइन केलेल्या राहण्याच्या जागांमधे ठेवण्यात आलं. यावेळी मोठ्या खिडक्यांमधून नैसर्गिक प्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश येत होता. किमान चार आठवड्यांच्या विश्रांतीनंतर, ते दुसऱ्या सत्रासाठी परतले, यावेळी वेगळ्या प्रकारे प्रकाश वातावरण करण्यात आलं होतं.  या विश्लेषणात सकारात्मक बदल दिसून आले.
advertisement
शरीराच्या चयापचय प्रक्रियेत दिसून येणारे सकारात्मक बदल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकाश उपचारापूर्वी, दरम्यान आणि नंतर विषयांकडून रक्त आणि स्नायूंचे नमुने घेतले.
याचे निकाल खूप मार्गदर्शक आहेत. नैसर्गिक प्रकाशामुळे शरीराच्या आतलं घड्याळ आणि चयापचय यावर प्रभाव पाडतो. हे कदाचित रक्तातील साखरेचं नियमन सुधारल्यामुळे आणि मेंदूतील मध्यवर्ती घड्याळ आणि अवयवांमधील घड्याळांमधील चांगल्या समन्वयामुळे असू शकतं असं या संशोधकांनी सांगितलं.
advertisement
मधुमेह असलेल्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं, आवश्यक पथ्य पाळणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : नैसर्गिक प्रकाश आरोग्यासाठी का महत्त्वाचा असतो ? शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी प्रकाशाचा काही संबंध असतो का ?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement