Dandruff : केसातला कोंडा कसा घालवायचा ? वापरुन पाहा सोपे आणि सहज उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नारळ तेल, कोरफड गर, अॅपल सायडर व्हिनेगर, बेकिंग सोडा हे कोंडा कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहेत. त्यातील अँटीफंगल गुणधर्मांमुळे कोंडा कमी करण्यासाठी मदत होते.
मुंबई : हिवाळा, थंड वाऱ्यामुळे त्वचा, केसांशी संबंधित समस्यांचं प्रमाण वाढतं. थंड वाऱ्यामुळे टाळूतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो. कोंड्यावर काही घरगुती उपचारांमुळे आराम मिळतो.
नारळ तेल, कोरफड गर, अॅपल सायडर व्हिनेगर, बेकिंग सोडा हे कोंडा कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहेत. यातल्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे कोंडा कमी करण्यासाठी मदत होते.
नारळ तेल - नारळ तेल वापरण्याआधी थोडं गरम करा आणि टाळूला वीस-तीस मिनिटं मसाज करा, नंतर केस शाम्पूनं धुवा. यामुळे कोंडा कमी होईलच पण केस मजबूत होतील.
advertisement
कोरफड गर - कोरफड गर त्वचेसाठीच नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे सूज कमी करू शकते, ज्यामुळे कोंड्यापासून आराम मिळू शकतो. यासाठी, कोरफडीचा ताजा गर काढा आणि टाळूला लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनी धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगर - अॅपल सायडर व्हिनेगर हा कोंड्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. हे आम्लयुक्त आहे, ज्यामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होतो. त्वचेचा पीएच पातळी संतुलित करून ते बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठीही मदत होऊ शकते. पाण्यात थोडं व्हिनेगर मिसळा आणि केसांना लावा आणि पंधरा मिनिटांनी केस धुवा.
advertisement
प्रोबायोटिक्स - दह्यासारखे इतर प्रोबायोटिक्स केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यातले बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते आणि कोंड्याची समस्या कमी होते.
बेकिंग सोडा - स्वयंपाकघरात असलेल्या बेकिंग सोड्यानं कोंडा कमी होऊ शकतो. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी याची मदत होते आणि खाज कमी होते. यातल्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे, कोंडा कमी व्हायला मदत होते. ओल्या केसांना बेकिंग सोडा लावा आणि टाळूला मसाज करा. ते एक ते दोन मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 8:14 PM IST











