Babar Azam : खचाखच भरलेल्या मैदानात एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केलं! धक्कादायक फोटोची Inside Story

Last Updated:

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरीने बाबरला लग्नासाठी भर मैदानात प्रपोज केल्याचं सांगण्यात येत आहे.

खचाखच भरलेल्या मैदानात एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केलं! धक्कादायक फोटोची Inside Story
खचाखच भरलेल्या मैदानात एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केलं! धक्कादायक फोटोची Inside Story
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा बाबरची चर्चा त्याचा खेळ नाही तर वेगळ्याच कारणामुळे सुरू आहे. सोशल मीडियावर बाबरचे बरेच फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरीने बाबरला लग्नासाठी भर मैदानात प्रपोज केल्याचं सांगण्यात येत आहे. हे फोटो खरे आहेत का खोटे? याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
@ankitmalik22 नावाच्या चाहत्याने 'एलिस पेरीने लाऊव्ह टीव्हीवर बाबरला लग्नासाठी प्रपोज केलं', असं लिहून बाबर आणि पेरीचे फोटो पोस्ट केले आहेत.
@Kshitij_Xtra नावाच्या यूजरने एलिस पेरीने बीबीएलदरम्यान बाबरला लग्नासाठी विचारलं आणि बाबरने हा प्रस्ताव स्विकारल्याची पोस्ट केली आहे.
तर @BajwaKehtaHaii नावाच्या व्यक्तीने बीबीएलमध्ये प्रेमाचा खेळ, असं म्हणत फोटो शेअर केले आहेत.
advertisement
@WealthArigato ने लिहिलं की एलिस पेरीने बीबीएलमध्ये बाबर आझमला लग्नासाठी विचारलं.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो पाहून अनेक जण या बातमीमध्ये तथ्य आहे का नाही? याचा शोध घेत आहेत. अत्यंत हुबेहुब दिसणारे हे फोटो एआयने बनवल्याचं आता स्पष्ट झालं आहे, त्यामुळे एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केल्याच्या फक्त अफवा आहे. एआयच्या माध्यमातून हे फोटो तयार करण्यात आले आहेत.
advertisement

बीबीएलमध्ये बाबरचा संघर्ष

बाबर आझम हा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाची टी-20 लीग असलेल्या बीबीएलमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत बाबर आझमची बॅट शांत राहिली आहे. एकूण सात सामन्यांमध्ये बाबरने (14+2+58*+2+58+9+2) फक्त 145 रन केले आहेत. बीबीएलमध्ये बाबरला आतापर्यंत फक्त 3 वेळा दोन आकडी धावसंख्या गाठता आली आहे. उरलेल्या प्रत्येक सामन्यात तो एक आकडी स्कोअरवर आऊट झाला आहे. मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध बाबरने 58 रनची नाबाद खेळी केली, जी त्याची बीबीएलमधली आतापर्यंतची सर्वोत्तम आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Babar Azam : खचाखच भरलेल्या मैदानात एलिस पेरीने बाबर आझमला प्रपोज केलं! धक्कादायक फोटोची Inside Story
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement