'सचिन आणि माझ्या अफेअरच्या चर्चा... ', 43 वर्षांनी महागुरूंच्या सुपरहिट सिनेमातील हिरोईनचा मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Pilgaonkar: तब्बल ४३ वर्षांनंतरही आजही यातील 'गुंजा आणि चंदन'ची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. याच निमित्ताने अभिनेत्री साधना सिंग यांनी सचिन पिळगांवकर आणि त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
advertisement
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साधना यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "नदिया के पार'च्या आधीच सचिन एक मोठे स्टार होते. मी जेव्हा मुंबईत नवीन होते, तेव्हा एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती. पुढे जेव्हा या सिनेमासाठी माझी निवड झाली, तेव्हा सचिनना माहीत नव्हतं की हिरोईन कोण आहे. माझा फोटो पाहताच ते म्हणाले, 'अरे, ही तर साधना! मी हिला ओळखतो.'"
advertisement
साधना पुढे सांगतात की, "आमची मैत्री इतकी घट्ट होती की लोकांनी आमच्या अफेअरच्या अफवा उडवायला सुरुवात केली. पण आमच्यात केवळ निखळ मैत्री होती. मात्र, एका तिसऱ्या व्यक्तीने आमच्या मैत्रीत विष कालवलं. त्या व्यक्तीमुळे सचिन माझ्या पतीपासून आणि कालांतराने माझ्यापासूनही दुरावले. आजही आम्ही भेटलो की ते प्रेमाने बोलतात, पण ती जुनी मैत्री आता उरलेली नाही."
advertisement
'नदिया के पार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होता. अवघ्या १८ लाख रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ५.४ कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच आपल्या खर्चाच्या जवळपास ३० ते ४० पट अधिक कमाई करून या सिनेमाने बॉलिवूडला हादरवलं होतं. आजही 'IMDb' वर या सिनेमाला ८.२ रेटिंग आहे, जे आजही अनेक मोठ्या चित्रपटांना मिळत नाही.
advertisement








