मराठी कलाकार आता दुबईमध्ये करणार कल्ला, सातासमुद्रापार रंगणार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट, कधी होणार सुरूवात?

Last Updated:

अभिनेता सुशांत शेलार यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘एस. एस. सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ (SSCBCL) आता सातासमुद्रापार झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

News18
News18
मुंबई: मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चा फक्त एकाच खेळाची आहे आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट! पण हे क्रिकेट मुंबईच्या गल्लीत नाही, तर चक्क दुबईच्या चकचकीत मैदानात रंगणार आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘एस. एस. सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ (SSCBCL) आता सातासमुद्रापार झेप घेण्यासाठी सज्ज झाली असून, मराठी कलाकार आता हातात बॅट आणि चेंडू घेऊन दुबईत धिंगाणा घालताना दिसणार आहेत.

मराठी कलावंतांची क्रिकेटच्या पीचवर एन्ट्री

कलाकार आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे, पण शूटिंगच्या घाईत आणि वेळेअभावी या कलाकारांना आपल्या आवडीच्या खेळासाठी वेळ मिळत नाही. हीच गोष्ट ओळखून सुशांत शेलार यांनी या सेलिब्रिटी लीगचे आयोजन केले आहे. ज्योती एन्टरटेन्मेन्टचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम दुबईत पार पडणार आहे. केवळ पुरुष कलाकारच नाही, तर महिला कलाकार, पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील या लीगमध्ये मैदानात उतरून आपली कौशल्ये दाखवणार आहेत.
advertisement

क्रिकेट टीम्सच्या नावांमध्ये दिसणार महाराष्ट्राची संस्कृती

या लीगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे टीमची नावं. केवळ खेळ म्हणून नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुशांत शेलार यांनी केला आहे. टीमची नावं ऐकूनच अभिमान वाटेल अशी आहेत. क्रिकेट टीमची नावं - रत्नदुर्ग-रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा-नागपूर, अजिंक्यतारा-सातारा, शिवनेरी-पुणे, पन्हाळा-कोल्हापूर, गोदावरी-नाशिक.
advertisement
या नावांतून महाराष्ट्राचा अभिमान सातासमुद्रापार पोहोचवण्याचा मानस आहे. लवकरच या टीमच्या लोगोचे अनावरण आणि टीममधील खेळाडूंची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहे.

मराठी सिनेसृष्टीला एकत्र आणण्याचा अट्टाहास

सुशांत शेलार हे केवळ पडद्यावरचे कलाकार नाहीत, तर ते समाजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. 'शेलार मामा फाऊंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी कोविड काळ असो किंवा पूरपरिस्थिती, नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आता मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीला एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही क्रिकेटची नवी संकल्पना मांडली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठी कलाकार आता दुबईमध्ये करणार कल्ला, सातासमुद्रापार रंगणार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट, कधी होणार सुरूवात?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement