कोणत्या शहराला 'सिटी ऑफ बांबू' म्हणतात? इथे सुईपासून घरापर्यंत सर्व काही बनतं फक्त बांबूपासून
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या प्लास्टिकच्या जगात लोक पुन्हा एकदा पर्यावरणाकडे वळत आहोत, त्यामुळे आता बांबूचे फर्निचर आणि वस्तू फॅशन मानल्या जातात. पण भारताच्या एका कोपऱ्यात असं एक शहर आहे, ज्याचं नाव, ओळख आणि तिथल्या लोकांचं संपूर्ण आयुष्यच गेल्या अनेक पिढ्यांपासून बांबूच्या भोवती विणलं गेलं आहे.
आपल्या घराची सजावट असो किंवा बागेतील कुंपण, 'बांबू' या शब्दाचा उल्लेख आला की आपल्या डोळ्यासमोर एक नैसर्गिक आणि टिकाऊ चित्र उभं राहतं. आजच्या प्लास्टिकच्या जगात लोक पुन्हा एकदा पर्यावरणाकडे वळत आहोत, त्यामुळे आता बांबूचे फर्निचर आणि वस्तू फॅशन मानल्या जातात. पण भारताच्या एका कोपऱ्यात असं एक शहर आहे, ज्याचं नाव, ओळख आणि तिथल्या लोकांचं संपूर्ण आयुष्यच गेल्या अनेक पिढ्यांपासून बांबूच्या भोवती विणलं गेलं आहे.
advertisement
advertisement
नावातच दडलंय बांबूचं साम्राज्य'बासवाडा' या नावाचा उगमच मुळ दोन शब्दांच्या संयोगातून झाला आहे. 'बास' (Bans) म्हणजे बांबू आणि 'वाडा' (Wara) म्हणजे भूमी किंवा प्रदेश. थोडक्यात सांगायचे तर 'बांबूची भूमी'. इतिहासकारांच्या मते, पूर्वी हा संपूर्ण भाग बांबूच्या घनदाट जंगलांनी वेढलेला होता. आजही या शहराच्या नावावरून तिथे असलेल्या बांबूच्या मुबलकतेची साक्ष मिळते.
advertisement
advertisement
advertisement
बांबूचा वापर केवळ वस्तू बनवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो इथल्या सण-उत्सवांचा आणि रीतीरिवाजांचा अविभाज्य भाग आहे. आदिवासी समुदायांच्या अनेक विधींमध्ये बांबूचे विशेष महत्त्व असते. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे 'स्वदेशी ज्ञान' आजही या भागात जपले गेले आहे. डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलांमुळे बासवाडाला निसर्गाचे वरदान लाभले आहे, ज्यामुळे येथील अर्थव्यवस्था आजही वनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
advertisement










