दत्तक घेणारा बाप कुठे गेला? राज ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांची यादीच वाचून दाखवली
- Published by:Sachin S
Last Updated:
२०१७ साली इथं फडणवीस आले आणि दत्तक घेतो म्हणाले. त्या सगळ्याला नाशिककर भूलले, आमचं काम विसरून गेले. दत्तक घेतो म्हणून बोलले आणि हा बाप परत फिरला नाही"
नाशिक : "२०१२ साली इथं मनसेची सत्ता आली होती, २०१७ साली इथं फडणवीस आले आणि दत्तक घेतो म्हणाले. त्या सगळ्याला नाशिककर भूलले, आमचं काम विसरून गेले. दत्तक घेतो म्हणून बोलले आणि हा बाप परत फिरला नाही" असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्या आश्वासनांची यादीच वाचवून दाखवली. तसंच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या लोकांनी ३ कोटी, ५ कोटी आणि एका घरात १५ कोटी रुपयांची ऑफर दिली असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली. विराट अशा गर्दीत ठाकरेंची तोफे चोहीकडे धडाडली. सर्वात आधी राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण पार पडलं. यावेळी, 'व्यासपीठावर उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि माझे मित्र संजय राऊत इतर मान्यवर आणि भावी नगरसेवक, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला.
advertisement
'कुणाला एक १ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले'
"अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कुणाला देता येणार नाही, कुणाला सांगता येणार नाही. इतकी वर्ष निवडणूक का घेता आल्या नाही, पालिकाच्या निवडणुका का होत नव्हत्या, याचं उत्तर भाजप सरकारने दिलं पाहिजे, इतक्या सगळ्या निवडणूक होत आहे, त्यामुळे इतका सगळा गोंधळ होत आहे, कोण कुणाकडे चाललाय, हेच कळत नाही, कॅरेम इतका फुटला आहे. कुणाच्या कवड्या कोणत्या भोकात जात आहे, कळत नाही. वेडेपीसे झाले आहे. त्या दिवशी मला कळलं, छाननीच्या वेळेला अर्ज भरण्याची मुदत निघून गेली, समोरच्या चा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बर वेळही नव्हता, सकाळी फॉर्मची वाट पाहायला वेळही नव्हती. ६० ते ७० उमेदवार हे बिनविरोध निवडून येतात. तिकडे मतदानांचा अधिकार ही काढून घेतात, काही वेळा तर दहशतीतून जास्ती जास्त वेळा पैसे दिले जात आहे. कुणाला एक १ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एका घरातील तिघे एका प्रभात उभे आहे, काय ऑफर दिली, एका घरात १५ कोटींची ऑफर तिघांना दिली. कुणाला २ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले. इतके पैसे येतात कुठून. महाराष्ट्रात ही वेळ कुठून आली. माणसांना भीती घालायची, दहशत निर्माण करायची, अशा वातावरणात निवडणूक घ्यायला पाहिजे.
advertisement
भाजपच्या निष्ठावंतांचा अपमान नाही का?
नाशिकमध्ये ५२ साली आलेला जनसंघ पक्ष आता २०२६ मध्ये पोरं भाड्याने घेताय, तुम्ही तुमची पोरं उभी केली ना, मग दुसऱ्याची पोरं का कड्यावर घेऊन फिरता. एकावेळी दोन चार उमेदवार देतात येतात हे समजू शकतो.पण पक्षासाठी इतकी वर्ष काम करतात, त्यांना उमेदवारी देत नाही, भाजपच्या निष्ठावंताचा अपमान नाही का?
advertisement
दत्तक घेतो म्हणून बोलले आणि हा बाप परत फिरला नाही
तपोवनमध्ये महाजनला झाडं छाटायचं होतं, लाकूड तोड्या बरा होता, आधी सोन्याची दिली, नंतर चांदीची दिली. तिच्या खरी दिली तेव्हा घेतली. झाडं छाटायच्या आधी स्वत: च्या पक्षातील लोक छाटली. बाहेरून उमेदवार घेतली आणि भाजपमध्ये झाडं लावली. ही कोणती निवडणूक चालू आहे. २०१२ साली इथं मनसेची सत्ता आली होती, २०१७ साली इथं फडणवीस आले आणि दत्तक घेतो म्हणाले. त्या सगळ्याला नाशिककर भूलले, आमचं काम विसरून गेले. दत्तक घेतो म्हणून बोलले आणि हा बाप परत फिरला नाही. काय काय सांगितलं होतं.
advertisement
फडणवीसांच्या आश्वासनांचं काय झालं?
फडणवीस काय बोलून गेले होते, नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिक रिंगरोड, नाशिक सेमी हायस्पिड मार्ग, इगतपुरी क्रीडा प्रबोधनी अशा अनेक घोषणा केल्या होत्या, पण काहीही केलं नाही, म्हणे दत्तक घेणार. यांना काम करायचं नाही. जाती आणि धर्माच्या नावावर भूलवायचं हेच काम केलं.
advertisement
बोटनिक गार्डन, गोदापार्क सगळं उद्धवस्त करून टाकलंय
२०१२ मध्ये कुंभ मेळा झाला, अत्यंत यशस्वी मेळावा झाला. त्यावेळी सगळ्याच पक्षाचे नगरसेवक साथीने कुंभमेळा केला. एकही झाड छाटलं नाही. उत्तम कुंभमेळा झाला. सगळ्यांचा सत्कार झाला, बोस्टनमध्ये सत्कार झाला मग आता काय सुरू आहे. एका उद्योगपतीसाठी जागा मोकळी करायची. साधू संत गेल्यानतर जागा उद्योगपतीच्या घशात घालायची आहे. अनेक उद्योगपतींनी शहरात आले, रतन टाटा शहरात आले होते. आज नाशिक शहराला मोकळे धरणापासून पाण्याची पाईपलाईन आली. पाण्याचा प्रश्न सोडला. जीपीएस लावली, घनकचरा प्रकल्प सुरू केला. वीटा खत शेतकरी घेऊन जातात. घनकचरा प्रकल्पाचा वास सुद्धा येत नाही. रतन टाटांकडे प्रकल्प घेऊन गेलो, त्यांनी खर्च विचारला, ५ कोटी खर्च येईल सांगितलं. त्यांची माणसं आणि सरकारने परवानगी दिली, त्यांचीच माणसं काम करत होती. रतन टाटा यांच्याकडून १५ ते १६ कोटी खर्च केले. बोटनिक गार्डन सगळं उद्धवस्त करून टाकलं. गोदापार्कचं जॉगिंग पार्क उद्धवस्त करून टाकलंय.
advertisement
नाशिक पालिकेत आमच्या काळात एकही भ्रष्टाचार नाही
नाशिक पालिकेवर ७०० कोटी कर्ज होतं, आम्ही पालिका कर्ज मुक्त केली. त्यावेळी सगळ्या नेते इथं होतं. एकही भ्रष्टाचार केल्याचं एकही उदाहरण नाही. रस्ते उत्तम केलं. कंत्राटदारांना सांगितलं होतं, पैसे लागले तर दिले जातील, पण खड्डा पडला तर कंत्राटदारांना खड्यात उभं करून मारीन असा इशारा दिला होता.
लाडकी बहिणीच्या योजनेतून १५०० रुपये दिले. १५०० रुपये दोन दिवसांमध्ये निघून गेले. एक सिलेंडर १००० रुपयांचा आहे. अनेक लोक आहे. पुढची पिढी काय म्हणेल, आमचा बाप विकला गेला, आमच्या आईने पैसे घेतले. इथं अनेक तरुण तरुणी हे परदेशात शिक्षणासाठी जाताय. शिक्षण तर इथंही मिळू शकतं. सभोतालचं वातावरण, रस्त्यावर ट्रफिक, फुटपाथ नाही. कशाचा आटोकच नाही. अशा लोकांच्या हातात तुम्ही शहरं देणार आहात का?
निवडणूक कशाला घ्यायच्या, पैसे घ्यायचे आणि हाच खेळ खेळायचा का?
view comments२०१२ साली आम्ही रतन टाटा, अंबानी इतकी चांगली माणसं आणली, मला काय मिळालं पराभव. आणि इथं भुलथापा देणाऱ्या लोकांना नाशिककर बळी पडले. घरोघरी पैशांचं वाटप सुरू आहे. आज पैसे घेणार, किती दिवस टिकणार आहे. पण शहरं दावणीला का टाकत आहात. निवडणूक कशाला घ्यायच्या, पैसे घ्यायचे आणि हाच खेळ खेळायचा आहे का? आज मी तुम्हाला सांगतोय, आज सत्ता देऊन बघा, पुन्हा नाशिकमध्ये चमत्कार घडवून दाखवल्या शिवाय राहणार नाही. बोर्डावर मला शिवसेना आणि मनसेचे १०० नगरसेवक असा आकडा दिसला पाहिजे. शहर चांगलं करायचं आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दत्तक घेणारा बाप कुठे गेला? राज ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांची यादीच वाचून दाखवली








