APMC Market Rate: लाल सोन्याला कुठे झळाळी तर कुठे नरमाई, महाराष्ट्रात डाळिंबाला भाव किती?

Last Updated:

शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
लाल

लाल सोन्यास कुठे झळाळी तर कुठे नरमाई 

मुंबई: शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1583 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 668 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 116 क्विंटल गुळास 3500 रुपये सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याच्या आवकेत घट: राज्याच्या मार्केटमध्ये आज 163 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 98 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 12000 ते 16000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 54 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 7500 ते 20500 रुपये दरम्यान सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1506 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 1141 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 5000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 600 ते 21100 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: लाल सोन्याला कुठे झळाळी तर कुठे नरमाई, महाराष्ट्रात डाळिंबाला भाव किती?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement