उद्धव ठाकरे पेंग्विनवर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले होय पेंग्विन...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
विरोधकांकडून शिवसेनेवर टीका करताना अनेकदा पेंग्विनचा उल्लेख केला जातो. मात्र,यावर आज पहिल्यांदाच नाशिकच्या सभेत भाष्य केले आहे
नाशिक : महाराष्ट्रात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर आज राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची आज ऐतिहासिक सभा पाहायला मिळाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेसेनेचा समाचार घेतला. तसेच मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनवर देखील भाष्य केले आहे. तसेच आम्ही एकत्र सत्तेसाठी, विकासासाठी आलोय, असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले आहे.
विरोधकांकडून शिवसेनेवर टीका करताना अनेकदा पेंग्विनचा उल्लेख केला जातो. मात्र,यावर आज पहिल्यांदाच नाशिकच्या सभेत भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, दहा वर्षापूर्वी आम्ही मुंबईतील जिजामाता उद्यानात पेंग्विन आणले, आमच्यावर पेंग्विन, पेंग्विन अशी टीका केली. होय, आम्ही पेंग्विन आणले. पण ते पेंग्विन पाहण्यासाठी लोकं तिकट काढून टीका करत आहे. या सभेत उल्लेख यासाठी केला की, त्यांच्या सभेसाठी माणसे पैसे देऊन आणावी लागतात. पेंग्विन एवढी किंमत देखील लोकांच्या लेखी देखील यांची नाही, अशी त्यांची अवस्था आहे.
advertisement
तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? ठाकरेंचा सवाल
आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तेच तिकडे गेले. वाईट निष्ठावान कार्यकर्त्यांचे वाटत आहे. देवयानी ताई यांच्याबाबत मला आदर आहे. त्यांना रडू आलं. तुमची निष्ठा ज्या पक्षाशी आहे, तो पक्ष आज उपऱ्यांचा दलालांचा पक्ष झाला आहे. शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाडे नाहीत असे मुनगंटीवार म्हणाले. भाजपमध्ये चोर दरोडेखोर येतात. राणालासुद्धा भाजपमध्ये घेतील एवढे निर्लज्ज झालेत. भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होते. भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? असा सवाल ठाकरेंनी केला.
advertisement
आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय: उद्धव ठाकरे
ठाकरे बोलतात ते करतात. मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहे. त्यांनी नि:पक्षपातीपणे काम केलं पाहिजे. भाजप मात्र, त्यांच्या घरात तीन तीन उमेदवार देते. पण यांनी काहीही केलं तरी चालते. निवडणूक आयोग शेपूट घालून बसले आहे. आज आपण सावध झाला नाहीतर गुलामीत राहावं लागेल. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोत. तुमच्या विकासासाठी आम्हाल सत्ता पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:02 PM IST










