Raj Thackeray: चुकीचा कॅरम फुटला,कोणती सोंगटी कोणाच्या भोXX गेली कळत नाही, राज ठाकरे नाशकात कडाडले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्यात सुरू असलेली विचित्र युत्यांचा राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे.
नाशिक : महाराष्ट्रात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर आज राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची आज ऐतिहासिक सभा पाहायला मिळाली. यावेळी राज्यात सुरू असलेली विचित्र युत्यांचा राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. कॅरेम इतका फुटला आहे. कुणाच्या कवड्या कोणत्या भोXX जात आहे, कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले आे
कुणी २० वर्षे, कुणी ४० वर्षे पक्षासाठी वाहून घेतलं, पण तिकिट कुणाला मिळाले तर उपऱ्यांना. कुठे सत्ताधारी अन् विरोधकांची युती आहे. तर कुठे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवारच दिला नाही. पण मग शेवटी प्रश्न पडतो सगळे युती-आघाडीत मग्न, विरोधक कोण? निवडणुका होत आहे, कोणता उमेदवार कुठे चाललाय हे कळत नाही सगळा गोंधळ निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार ७० उमेदवार निवडून आहे. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक एवढे कसे निवडून येत आहे. प्रत्येकाल विचारावं लागतं तुम्ही कुठून आलात....वेडेपीसे झाले आहे , असे राज ठाकरे म्हणाले
advertisement
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मी तुम्हाला सगळ्यांना वेगळ्या वेळेला सांगेल तेव्हा घोषणा द्यायच्या, अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कुणाला देता येणार नाही, कुणाला सांगता येणार नाही. इतकी वर्ष निवडणूक का घेता आल्या नाही, पालिकाच्या निवडणुका का होत नव्हत्या, याचं उत्तर भाजप सरकारने दिलं पाहिजे, इतक्या सगळ्या निवडणूक होत आहे, त्यामुळे इतका सगळा गोंधळ होत आहे, कोण कुणाकडे चाललाय, हेच कळत नाही, कॅरेम इतका फुटला आहे. कुणाच्या कवड्या कोणत्या भोXX जात आहे, कळत नाही, वेडेपीसे झाले आहे. त्या दिवशी मला कळलं, छाननीच्या वेळेला अर्ज भरण्याची मुदत निघून गेली, समोरच्या चा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बर वेळही नव्हता, सकाळी फॉर्मची वाट पाहायला वेळही नव्हती. ६० ते ७० उमेदवार हे बिनविरोध निवडून येतात. तिकडे मतदानांचा अधिकार ही काढून घेतात, काही वेळा तर दहशतीतून जास्ती जास्त वेळा पैसे दिले जात आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
advertisement
राज ठाकरे म्हणाले, कुणाला एक १ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एका घरातील तिघे एका प्रभात उभे आहे, काय ऑफर दिली, एका घरात १५ कोटींची ऑफर तिघांना दिली. कुणाला २ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले. इतके पैसे येतात कुठून. महाराष्ट्रात ही वेळ कुठून आली. माणसांनाा भीती घालायची, दहशत निर्माण करायची, अशा वातावरणात निवडणूक घ्यायला पाहिजे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 8:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: चुकीचा कॅरम फुटला,कोणती सोंगटी कोणाच्या भोXX गेली कळत नाही, राज ठाकरे नाशकात कडाडले









