Shukra Grah Upay: या शुक्रवारी करून पाहाच या 6 पैकी उपाय; शुक्रदोष कमी झाल्यास राजेशाही थाट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Grah Upay: ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला प्रेम, भौतिक सुख-सुविधा, रोमान्स, वैवाहिक सौख्य, कला, धन आणि सौंदर्याचा कारक मानले जाते. ज्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र दुबळा असतो, त्यांना प्रेमसंबंधात अडचणी, कौटुंबिक सुखाचा अभाव आणि आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो.
मुंबई : प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व असून शुक्रवार देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला प्रेम, भौतिक सुख-सुविधा, रोमान्स, वैवाहिक सौख्य, कला, धन आणि सौंदर्याचा कारक मानले जाते. ज्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र दुबळा असतो, त्यांना प्रेमसंबंधात अडचणी, कौटुंबिक सुखाचा अभाव आणि आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. विशेषतः कला आणि ग्लॅमर क्षेत्रात असणाऱ्यांना यशासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
शुक्र ग्रह प्रबळ करण्यासाठी खालील उपाय फायदेशीर:
शुक्रवारी उपवास आणि मंत्रजप - शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचे व्रत करावे. पूजेच्या वेळी 'ॐ शुं शुक्राय नमः' किंवा 'ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः' या शुक्र बीज मंत्राचा जप केल्यास शुभ फळ मिळते.
रत्न धारण करणे - शुक्राचा शुभ रत्न 'हिरा' आहे आणि उपरत्न 'ओपल' मानले जाते. तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन हे रत्न सोने किंवा चांदीमध्ये धारण करता येते. हिरा सर्वांनाच मानवतो असे नाही, त्यामुळे तो काही दिवस वापरून पाहिल्यानंतरच कायमस्वरूपी धारण करावा.
advertisement
दानधर्म - शुक्र दोषाचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी कपडे, तांदूळ, सौंदर्य प्रसाधने, अत्तर, अगरबत्ती किंवा चंदनाचे दान करावे. यामुळे शुक्रदेव प्रसन्न होतात.
चारित्र्य आणि संयम - शुक्र खराब असताना व्यक्तीने संयम पाळणे आवश्यक असते. मांस, मद्य आणि भोग-विलासापासून दूर राहावे. महिलांचा आदर करावा आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रामाणिक राहावे.
advertisement
रंग आणि सुगंधाचा वापर - ज्यांचा शुक्र कमकुवत आहे त्यांनी नियमितपणे अत्तर किंवा चंदनाचा वापर करावा. कपड्यांमध्ये क्रीम किंवा गुलाबी रंगाला प्राधान्य द्यावे किंवा किमान या रंगाचा रुमाल जवळ ठेवावा.
रिलेशन प्रामाणिकपणा - प्रेमसंबंधात असताना जोडीदाराला फसवू नये. प्रेमात प्रामाणिक राहिल्याने शुक्राचे नकारात्मक प्रभाव कमी होतात, अन्यथा परिस्थिती अधिक बिघडू शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shukra Grah Upay: या शुक्रवारी करून पाहाच या 6 पैकी उपाय; शुक्रदोष कमी झाल्यास राजेशाही थाट











