Budh Gochar: वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार, अर्थसंकट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Nakshatra Gochar: दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी बुध ग्रह पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पूर्वाषाढा हे शुक्राचे नक्षत्र असल्याने बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते. खास करून करिअर आणि आर्थिक बाबतीत या राशींनी सावध राहणे गरजेचे आहे. या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही विशेष उपाय फायदेशीर ठरू शकतात.
वृषभ रास - बुधाच्या या नक्षत्र बदलामुळे तुमच्या जीवनात काही नकारात्मक बदल घडू शकतात. तुम्हाला तुमच्या आर्थिक बाजूबाबत खूप सतर्क राहावे लागेल. कोठेही गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. यासोबतच करिअरशी संबंधित कोणताही मोठा निर्णय या काळात घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आजारपण उद्भवण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना हिरव्या बांगड्या किंवा हिरवे वस्त्र भेट म्हणून द्या.
advertisement
कर्क - बुध गोचरानंतर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. कार्यक्षेत्रात परिस्थिती तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा, अन्यथा मानहानी होऊ शकते. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होणार नाही. पैशांची देवाणघेवाण करताना विचारपूर्वक करा. उपाय म्हणून भगवान गणेशाची मनोभावे पूजा करा.
advertisement
मकर राशीच्या व्यक्तींना सामाजिक स्तरावर वावरताना जपून राहावे लागेल. संवाद साधताना शब्दांचा वापर विचारपूर्वक करा, कारण तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. आर्थिक चणचण भासण्याची शक्यता असल्याने योग्य बजेट बनवूनच पुढे जा. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना या काळात अधिक मेहनत करावी लागेल. उपाय म्हणून नकारात्मकता दूर करण्यासाठी गाईला हिरवा चारा खायला द्या.
advertisement
बुधवारी शक्य असल्यास मुगाच्या डाळीचे सेवन करावे. या दिवशी हिरव्या पालेभाज्या खाणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास बुधवारी मीठ कमी खावे किंवा मिठाचा त्याग करावा, यामुळे बुधाचा प्रभाव सकारात्मक होतो. बुधवारी गरजू व्यक्तीला हिरवे मूग, हिरवे कापड किंवा हिरव्या भाज्या दान कराव्यात. या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा पालक खायला घालणे हा बुधाला शांत करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो.
advertisement
गणेश उपासना: बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे आणि त्याचे आराध्य दैवत भगवान गणेश आहेत. बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. मंत्र जप: 'ॐ बुं बुधाय नमः' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने मानसिक स्पष्टता मिळते आणि निर्णयक्षमता सुधारते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










