Health Tips : दिनचर्येतले बदल तब्येतीसाठी फायदेशीर, संकल्प पूर्ण करण्यासाठी या टिप्स ठरतील उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आरोग्याकडे नीट लक्ष देणं हा अनेकांचा संकल्प आहे. पण अनेकदा, गेल्याही वर्षी संकल्प करुन पूर्ण होत नाहीत. तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर इथल्या टिप्सचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. दिनचर्येत लहान बदल केले आणि ते नियमित केले तर आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहू शकतं.
मुंबई : नवीन वर्ष म्हणजे काही संकल्प मनात असतात. 2026 च्या सुरुवातीपासूनच काहीजणांनी वजन कमी करणं, व्यायाम यासारखे संकल्प केलेत.
आरोग्याकडे नीट लक्ष देणं हा अनेकांचा संकल्प आहे. पण अनेकदा, गेल्याही वर्षी संकल्प करुन पूर्ण होत नाहीत. तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर इथल्या टिप्सचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. दिनचर्येत लहान बदल केले आणि ते नियमित केले तर आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहू शकतं.
advertisement
जोटा हेल्थकेअर ग्रुपचे सीईओ डॉ. सुजित पॉल, यांनी संकल्प साध्य करण्यासाठी सातत्य तसंच दिनचर्येतले बदल कसे महत्त्वाचे आहेत याविषयी पोस्ट केली आहे.
दिवसाची सुरुवात - दिवसाची सुरुवात नेहमी एक ग्लास कोमट पाण्यानं करा, थोडं चालत जा, शरीराची हालचाल करा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे शरीर सक्रिय होतं आणि येणाऱ्या दिवसासाठी शरीर तयार होतं. या पायऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रथिनयुक्त आहारावर भर द्या.
advertisement
औषध - रक्तातील साखर वाढणं, रक्तदाब, थकवा, ॲसिडिटी अशा अनेक समस्या दैनंदिन आयुष्यात जाणवत असतात. यापैकी अनेक समस्या औषधोपचारानं आणि दिनचर्येत सुधारणा करून मोठ्या प्रमाणात नियंत्रित केल्या जाऊ शकतात. वेळेवर जेवणं, जास्त वेळ उपाशी न राहणं आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवणं, या सवयी औषधांची गरज कमी करण्यास मदत करतात.
बराच वेळ बसून राहणं टाळा - सतत बसून काम करण्याचं प्रमाण सध्या वाढलंय. पण याचे शरीरावर परिणाम होतात. दर तासाला दोन ते तीन मिनिटं उभं राहणं, पायऱ्या चढणं किंवा उभं राहून फोन कॉल करणं हे छोटे बदल स्नायू, पाठीचा कणा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
advertisement
पुरेशी झोप - आपण अनेकदा झोपेला कामानंतर उरलेला वेळ मानतो, पण झोप अपुरी असेल तर वजन वाढणं, प्रतिकारशक्ती कमी होणं आणि हार्मोनल असंतुलन अशा समस्या जाणवतात. दररोज एकाच वेळी झोपायला जाणं आणि झोपेतून उठणं, झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी पाहणं आणि कॅफिनचं मर्यादित सेवन करणं या काही सवयींमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
advertisement
हायड्रेशन - पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा, डोकेदुखी आणि खोटी भूक लागू शकते. दिवसभरात थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावा. जंक फूडनं भूक भागवण्याऐवजी, फळं, भाजलेले चणे किंवा काजू यासारखे सोपे पर्याय निवडा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 10:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : दिनचर्येतले बदल तब्येतीसाठी फायदेशीर, संकल्प पूर्ण करण्यासाठी या टिप्स ठरतील उपयुक्त









