'अरे, पाडा ना उलटा', उद्धव ठाकरे खूश झाले, शिंदेंबद्दल भाजप नेत्याला जाहीर सभेत केलं आव्हान

Last Updated:

गणेश नाईक हे पहिले आपलेच. आता त्यांच्या दोघांमध्ये लागलं आहे.  नव्या मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी घोटाळा केला आहे.

News18
News18
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची विराट अशी सभा पार पडली. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट केलं. तर, यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यातील वादावर खूश होऊन जाहीर सभेतून आव्हानचं केलं आहे.  अरे, पाडा ना उलटा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट गणेश नाईकांना टांगा पाडण्यासाठी इच्छाच बोलून दाखवली.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तुफान गर्दी संयुक्त सभा  पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. खास करून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाचाही त्यांनी समाचार घेतला.
"गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे आपलेच आहे. गंमत कशी आहे. हे मिंधे कोण पूर्वाश्रमीचे आपलेच पण आज कोण गद्दार, गणेश नाईक हे पहिले आपलेच. आता त्यांच्या दोघांमध्ये लागलं आहे.  नव्या मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी घोटाळा केला आहे. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंध्यांचा टांगा पलटी करतो. मलाा गणेश नाईकांना सांगायंच टांग्यात बसता कशाला, एकतर टांग्यात टांग घाला नाहीतर टांगा तरी पलटी करा. तंगड्यात तंगडी घालायची आणि टांग्यात बसायचं. अरे, पाडा ना उलटा.  म्हणजे, ही लोकच सांगत आहे, अभ्रद्र युती कशी झाली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गणेश नाईक यांना थेट आव्हानचं केलं.
advertisement
देवयानी फरांदे भाजपमध्ये दलाल असं म्हणाल्या
"मला भाजपच्या निष्ठावंत देवयानी फरांदे ताईंना रडू आवरलं नाही, हे आवडलं नाही. आज मी जे बोलतोय त्यावर नक्की टीका करा, ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगताय, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. हे माझं वाक्य नाही देवयानी ताईंचं वाक्य आहे, दलालांनी चुकीचं ब्रिफींग केलं आहे.  सुधीर मुनगंटीवार म्हणताय, भाजपला दरवाजेच नाहीये, मुनगंटीवार तुम्हाला कल्पना आहे, शनीशिंगानापूरला संकटग्रस्त जातात,  पण भाजपमध्ये येतात ईडी, सीबीआयग्रस्त येताय. चोर दरोडखोर सुद्धा येत आहे. उद्या रावण जर पक्षात आला तरी त्याला पक्षात घ्यायला बसले. एवढे निर्ल्लज्ज झाले आहे कुठे आहे, यांचं हिंदूत्व?
advertisement
भाजपने एमआयएम सोबत युती ते काय होतं? 
"भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होतो. आता अकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली, अंबरनाथमध्ये जिथे शिव मंदिर आहे. मिंध्याचा पक्ष होता, तिथे काँग्रेससोबत युती केली. बरं समविचारी म्हणजे काय तर सगळे भ्रष्टाचारी आणि चोर दरोडखोर एकत्र येत आहे. भ्रष्टाचार मेळावा भाजप पक्ष वाढवावा"
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अरे, पाडा ना उलटा', उद्धव ठाकरे खूश झाले, शिंदेंबद्दल भाजप नेत्याला जाहीर सभेत केलं आव्हान
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement