Suzukiची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! 95km रेंज, 7 वर्षांच्या वॉरंटीसह मिळतील ऑफर्स

Last Updated:
Suzuki ने भारतात आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर e-Access लॉन्च केला आहे. जो 95km ची रेंज, 71kmph ची टॉप स्पीड आणि 7 वर्षांच्या फ्री वॉरंटीसह येतो. किंमत 1.88 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र खरा गेम याच्या जबरदस्त ऑफर्स आणि फीचर्सने बदलला आहे.
1/8
Suzuki e-Access Electric Scooter: इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या वाढत्या मागणी दरम्यान जापानी कंपनी Suzuki ने देखील भारतीय ईव्ही बाजारात पाऊल ठेवले आहे. Suzuki Motorcycle India ने आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर Suzuki e-Access लॉन्च केला आहे. हा स्कूटर फक्त विश्वासार्ह ब्रँडचं नावच घेऊन आला नाही. तर रेंज , फीचर्स आणि ऑफर्सच्या बाबतीतही ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे कंपनीने याला शहरी यूझर्सला लक्षात घेऊन तयार केले आहे. कारण येथेच इलेक्ट्रिक स्कूटर वेगाने लोकप्रिय होत आहेत.

advertisement
2/8
Suzuki e-Access किंमत आणि बुकिंग : सुझुकी ई-अ‍ॅक्सेस भारतात ₹1,88,490 (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करण्यात आली आहे. बुकिंग देखील सुरू झाली आहे. ग्राहक देशभरातील अधिकृत सुझुकी डीलरशिपवर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे ते बुक करू शकतात.

3/8
Suzuki e-Access पहिल्यांदाच भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर करण्यात आला होता. येथे या स्कूटरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता लॉन्चसह Suzuki ने अधिकृतरित्या भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. जिथे पहिल्यापासून स्टार्टअप आणि स्थापित कंपन्यांचे वर्चस्व आहे.

4/8
ग्राहकांसाठी खास ऑफर : सुझुकी ई-अ‍ॅक्सेससह कंपनी अनेक आकर्षक ऑफर देत आहे. यामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 7 वर्षांपर्यंत किंवा 80,000 किलोमीटरपर्यंतची वाढीव वॉरंटी समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, तीन वर्षांनंतर स्कूटरच्या किमतीच्या 60% पर्यंत बाय-बॅक गॅरंटी (प्रारंभिक ऑफर) देखील उपलब्ध आहे. विद्यमान सुझुकी ग्राहकांना ₹10,000 पर्यंतचा लॉयल्टी बोनस मिळतो आणि नवीन ग्राहकांना ₹7,000 पर्यंतचा वेलकम बोनस मिळतो. फायनेन्स स्किम्सची सुरुवात 5.99% व्याजाने सुरू होतात आणि 24 तासांपासून ते 3 वर्षांपर्यंत फ्लेक्सिबल रेंटल ऑप्शन उपलब्ध आहेत.

5/8
कलर ऑप्शनमध्येही मिळेल स्टाइल : Suzuki e-Access चार ड्यूल-टोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये Metallic Mat Black with Metallic Mat Bordeaux Red, Pearl Grace White with Metallic Mat Fibroin Gray, Pearl Jade Green with Metallic Mat Fibroin Gray आणि नवीन Metallic Mat Stellar Blue with Metallic Mat Fibroin Gray चा समावेश आहे.

6/8
बॅटरी, रेंज आणि परफॉर्मेंस : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.07 kWh ची Lithium Iron Phosphate बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फूल चार्ज होणारी ही स्कूटर जवळपास 95 किलोमीटरपर्यंत चालू शकते. मोटर 5.49 bhp ची पॉवर आणि 15 Nm चा टॉर्क जनरेट करते. ज्यामुळे याची टॉप स्पीड 71 किमी प्रति तासपर्यंत होते.

7/8
चार्जिंग आणि राइड मोड्स : Suzuki e-Access सोबत पोर्टेबल चार्जर मिळतो. नॉर्मल चार्जरने याला फूल चार्ज होण्यास जवळपास 6 तास 42 मिनिटं लागतात. तर फास्ट चार्जरने हे 2 तास 12 मिनिटांत चार्ज होते. स्कूटरमध्ये Eco, Ride A आणि Ride B सारखे राइड मोड्ससह रिव्हर्स मोड आणि रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंगही देण्यात आले आहेत.

8/8
हलके आणि मजबूत डिझाइन : Suzuki e-Access हे हलक्या पण मजबूत चेसिसवर बनवले आहे. त्यात फ्रेममध्ये अॅल्युमिनियम बॅटरी केस समाविष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे स्कूटरची स्टेबिलिटी, स्मूद कॉर्नरिंग आणि बॅलेन्स सुधारते. यात एलईडी लाइटिंग, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि देखभाल-मुक्त ड्राइव्ह बेल्ट देखील आहे, ज्याचे आयुष्य 7 वर्षे किंवा 70,000 किलोमीटर पर्यंत असल्याचा दावा केला जातो. Suzuki e-Access अशा लोकांसाठी एक नवा पर्याय म्हणून आली आहे जे विश्वासार्ह ब्रँडसह इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहेत.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement