13 जानेवारीपासून 'या' 3 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, अडचणी वाढवणार वर्षातील पहिलं शुक्र गोचर!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, वैभव आणि प्रेमाचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्राची चाल बदलते, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनावर होतो.
Shukra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, वैभव आणि प्रेमाचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्राची चाल बदलते, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनावर होतो. 13 जानेवारी 2026 रोजी शुक्र देव धनु राशीतून बाहेर पडून शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत शुक्र 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे. या गोचरामुळे काही राशींना राजयोगाचे फळ मिळेल, तर मेष, मिथुन आणि धनु या 3 राशींच्या जातकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार, या राशींनी संक्रांतीपूर्वीपासूनच सावध राहणे गरजेचे आहे.
मेष
खर्चात वाढ आणि मानसिक तणाव मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर दहाव्या भावात होणार आहे. जरी हे कर्म स्थान असले, तरी शुक्राच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी काही गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते. कोणत्याही नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा आणि बोलताना संयम पाळा.
advertisement
मिथुन
आरोग्याच्या तक्रारी आणि कौटुंबिक कलह शुक्र तुमच्या आठव्या भावात गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रात आठवे स्थान हे अडथळ्यांचे मानले जाते. जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. घरातील सुख-शांती बिघडण्याची शक्यता आहे. या काळात त्वचेचे विकार किंवा गुप्त आजार त्रास देऊ शकतात. बाहेरील अन्न खाणे टाळा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
advertisement
धनु
आर्थिक जोखीम आणि फसवणूक शुक्र आता तुमच्या राशीतून बाहेर पडणार आहे. यामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये थोडी घट जाणवू शकते. पैशांच्या व्यवहारात फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल. वैयक्तिक आयुष्यात काही गुपिते उघड झाल्यामुळे तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. जवळच्या व्यक्तीवरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 2:21 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
13 जानेवारीपासून 'या' 3 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, अडचणी वाढवणार वर्षातील पहिलं शुक्र गोचर!











