रश्मी देसाई आजही योग्य जोडीदाराच्या शोधात, म्हणाली,"आता माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rashmi Desai : रश्मी देसाईचं लग्न मोडलं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत ते रिलेशनमध्ये होती ते नातंही त्याचं तुटलं आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.
advertisement
रश्मी देसाईची वैयक्तिक आयुष्यात अनेकदा फसवणूक झाली आहे. त्यामुळे प्रेम आणि लग्नाबाबत तिची मते आता वेगळी आहेत. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, जर ती कोणाशी भावनिकरित्या जोडली गेली तर ती आपले सर्वस्व त्या व्यक्तीला देऊ शकते. अभिनेता नंदीश संधूसोबतचे तुटलेले लग्न आणि अनेकांना डेट केल्यानंतरही रश्मी आजही योग्य जोडीदाराच्या शोधात आहे.
advertisement
आयएएनएसला दिलेल्या खास मुलाखतीत रश्मीने प्रेम, लग्न आणि नातेसंबंधांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, हे दोघे नेहमी हसतमुख दिसतात, पण त्यांनी आयुष्यात खूप काही सहन केले आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि त्यामुळेच ते परफेक्ट कपल आहेत, जे भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही पातळ्यांवर एकमेकांसोबत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
‘उतरन’ या मालिकेत काम करत असतानाच रश्मीची भेट अभिनेता नंदीश संधूशी झाली होती. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रश्मीचे नाव अरहान खान आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेले. मात्र सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यावर रश्मीने कधीही उघडपणे बोलणे टाळले, तरी दोघांमधील मतभेद सर्वांनाच माहीत होते.









