'द राजा साब' पाहत होते प्रेक्षक, प्रभासच्या फॅन्सने थेट थिएटरच पेटवून दिलं, नेमकं घडलं काय? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता प्रभासचा 'द राजा साब' हा सिनेमा पाहून त्याच्या फॅन्सनी थेट थिएटरच पेटवून दिलं. थिएटरच्या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या शुक्रवारी एकाहून एक तगडे सिनेमे रिलीज झालेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे प्रभासचा 'द राजा साब'. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी प्रभासच्या अभिनयाचं कौतुक केलं असलं. तर काहींनी सिनेमाचं कथानक आणि मांडणीवरून नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान सिनेमा रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोठी घटना घडली आहे. थिएटरमध्ये प्रेक्षक 'द राजा साब' सिनेमा पाहत असताना प्रभासच्या चाहत्यांनी थेट थिएटरच पेटवून दिलं आहे. नेमकं झालं काय?
ओडिशामधील एका थिएटरमध्ये 'द राजा साब' सिनेमा सुरू असताना चाहत्यांनी थेट कन्फेटीला आग लावल्याचा प्रकार घडला. उडीसा येथील अशोक थिएटरमध्ये ही घटना घडल्यातं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात प्रेक्षक मोठ्या पडद्यावर 'द राजा साब' पाहत असताना काही लोक स्क्रीनसमोर रंगीत कागद म्हणजेच कन्फेटी पेटवत असल्याचं स्पष्ट दिसतं. या प्रकारामुळे थिएटरमधील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
advertisement
प्रभासची फॅन फॉलोइंग किती प्रचंड आहे. प्रभासचा सिनेमा कसा ही असो त्याचे चाहते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. अशा प्रकारामुळे मोठा अपघात घडू शकला असता अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
या घटनेनंतर सोशल मीडियावर संपात व्यक्त करण्यात आला आहे. एका युझरनं लिहिलंय, "ही प्रभासच्या फॅन्सची मॅच्युरिटी आहे का? मी प्रभासबद्दल नाही, तर फॅन्सबद्दल बोलतोय. असं वागणं अजिबात योग्य नाही. हे तुमचं घर नाही. अशा वागणुकीमुळे प्रभासचंच नाव खराब होत आहे." तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, "अशा प्रकारांवर तात्काळ बंदी घालायला हवी. हे अत्यंत धोकादायक आहे आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो."
advertisement
ରାୟଗଡ଼ା ଅଶୋକ ଟକିଜ୍ରେ ସୁପରଷ୍ଟାର ପ୍ରଭାସଙ୍କ ଏଣ୍ଟ୍ରି ବେଳେ ସିନେମା ହଲ୍ ଭିତରେ ଲାଗିଲା ନିଆଁ..
'ଦି ରାଜା ସାହବ'ର ରିଲିଜ୍ ହୋଇଥିଲା ସ୍କ୍ରିନ ସାମ୍ନାରେ ଆଳତି କରିବା ବେଳେ ହଲ୍ ଭିତରେ ଲାଗିଯାଇଥିଲା ନିଆଁ #Rayagada #AshokTalkies #FireAccident pic.twitter.com/dbDRpPegbU
— Bibhuti Bhusan Das (@bibhutids) January 10, 2026
advertisement
'द राजा साब' या सिनेमानं पहिल्याच दिवशी 63.3 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात प्रभाससोबत संजय दत्त, बोमन ईरानी, निधी अग्रवाल, मालविका मोहनन (तेलुगू सिनेमातील पदार्पण), रिद्धी कुमार आणि जरीना वहाब हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर ही कथा राजा (प्रभास) आणि त्याची आजी गंगम्मा (जरीना वहाब) यांच्या नात्याभोवती फिरते. अल्झायमर आजाराशी झुंज देणारी गंगम्मा आपल्या बेपत्ता पती कनकराजू (संजय दत्त) यांना विसरू शकत नाही. आजीच्या या आशेच्या बळावर राजा आपल्या आजोबांचा शोध घेण्यासाठी एका प्रवासाला निघतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 12:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'द राजा साब' पाहत होते प्रेक्षक, प्रभासच्या फॅन्सने थेट थिएटरच पेटवून दिलं, नेमकं घडलं काय? VIDEO








