वाह रे वाह! तब्बल 27 वर्षांनी शनि करणार नक्षत्र परिवर्तन, 20 जानेवारीपासून या राशींकडे आनंदासह येणार पैसाच पैसा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, नक्षत्र आणि राशी परिवर्तन यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली गती आणि स्थान बदलतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, नक्षत्र आणि राशी परिवर्तन यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली गती आणि स्थान बदलतो. या ग्रहांमध्ये कर्म, शिस्त, संयम आणि न्यायाचे प्रतीक मानले जाणारे शनीदेव विशेष महत्त्वाचे आहेत. शनीची स्थिती बदलली की अनेकांच्या आयुष्यात मोठे चढ-उतार पाहायला मिळतात. येत्या 20 जानेवारी रोजी शनीदेव स्वतःच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनीचा हा नक्षत्र बदल काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेषतः नोकरी, व्यवसाय, आर्थिक प्रगती आणि सामाजिक मान-सन्मानाच्या दृष्टीने काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो.
advertisement
advertisement
मकर रास - मकर राशीच्या जातकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. शनी हा मकर राशीचा स्वामी ग्रह असल्याने या बदलाचा प्रभाव अधिक सकारात्मक राहील. या काळात तुमच्या साहस, धाडस आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात असाल तर विस्तारासाठी योग्य काळ ठरू शकतो. परदेशाशी संबंधित कामे, शिक्षण किंवा प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. भावंडांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि निर्णयक्षमता वाढेल.
advertisement
कर्क रास - कर्क राशींसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन भाग्यवर्धक ठरू शकते. शनी या राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार असल्याने नशिबाची साथ लाभेल. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ या काळात मिळू शकते. धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी आणि मार्गदर्शक व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थिरता येईल आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
मिथुन रास - मिथुन राशीच्या जातकांसाठीही शनीचे हे नक्षत्र परिवर्तन शुभ संकेत देणारे आहे. शनी या राशीच्या कर्मस्थानात प्रवेश करणार असल्याने करिअरशी संबंधित घडामोडींना वेग येईल. नोकरीत असाल तर प्रमोशन, नवीन पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होईल आणि कामाचा व्याप वाढेल. सहकारी आणि वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील. घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मित्रपरिवारातून लाभ होईल. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
advertisement









