Mumbai Metro : मिरा रोड ते अंधेरी थेट प्रवास, मुंबईत पहिल्यांदाच स्टेशनवरून बदलता येणार मेट्रो लाईन, पाहा कुठं आणि कसं?
Last Updated:
Mumbai Metro Update : मुंबई मेट्रोमध्ये दहिसर पूर्व इंटरचेंज सुरू झाला आहे. प्रवाशांना एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर थेट जाण्याची सुविधा मिळाली आहे. मिरा-भाईंदर ते अंधेरीचा प्रवास आता 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होईल. गर्दी आणि वाहतूक कोंडीही कमी होईल.
मुंबई : मुंबईतील मेट्रोचे जाळे झपाट्याने वाढत आहे आणि प्रवाशांसाठी प्रवास आता अधिक सोपा होत आहे. पूर्वी एका मेट्रो मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर जाऊन काही अंतर चालावे लागायचे. पण आता हा त्रास संपणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच पेड एरिया इंटरचेंज सुरू झाला असून एका स्थानकावरून थेट मार्गिका बदलता येणार आहेत.
मिरा रोड ते अंधेरी प्रवास आता थेट
ही सुविधा दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर सुरू झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ही सुविधा विकसित केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये कमिशनिंग झाल्यानंतर सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आणि आता फेज 1 पूर्ण क्षमतेने चालू आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रोमध्येच राहून एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाणे शक्य झाले आहे.
advertisement
दहिसर पूर्व इंटरचेंजमुळे मेट्रो लाईन 7, लाईन 2A आणि लाईन 9 फेज 1 एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे दहिसर ते अंधेरी तसेच मिरा-भाईंदर ते मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात प्रवास अधिक सोपा झाला आहे. विशेष म्हणजे आता मेट्रो लाईन 1 ते लाईन 7 दरम्यानही थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
मेट्रो लाईन 9 चा फेज 1 हा 4.5 किलोमीटर लांबीचा असून दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव हे चार स्थानक समाविष्ट आहेत. मिरा-भाईंदरमधील प्रवासी आता काशिगाव येथून थेट अंधेरी पूर्वपर्यंत प्रवास करू शकतील यामुळे प्रवासाचा वेळ पूर्वीच्या 90 मिनिटांऐवजी 50 मिनिटांपेक्षा कमी होईल. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि दहिसर टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडीही कमी होईल. CMRS सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर तसेच निवडणूक आचारसंहितेमुळे अधिकृत उद्घाटन उशिरा झाले पण 15 जानेवारीनंतर ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मिरा रोड ते अंधेरी थेट प्रवास, मुंबईत पहिल्यांदाच स्टेशनवरून बदलता येणार मेट्रो लाईन, पाहा कुठं आणि कसं?









