MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?

Last Updated:

कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि घोटेघर या शहरांमध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात घरांची लॉटरी निघणार आहे.

MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)ने नुकतेच घरांबद्दल माहिती दिली आहे. अद्याप घरांबद्दल सोडत जाहीर झालेली नाही. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि घोटेघर या शहरांमध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात घरांची लॉटरी निघणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांचं मुंबईमध्ये नाही, किमान मुंबई उपनगरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्याच्या घडीला मुंबई सारख्या शहरामध्ये सामान्य माणसाला घर घेणं शक्य नाही. त्यामुळे जर तुम्ही ठाणे, डोंबिवली आणि कल्याण सारख्या शहरामध्ये घर घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2026 मध्ये 2,000 घरांच्या लॉटरी निघणार आहेत. कोकण मंडळाकडून दोन हजार घरांसाठीची जाहिरात फेब्रुवारी महिन्यात काढली जाणार असून एप्रिल- मे महिन्यात लॉटरी निघणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरांमध्ये सध्याच्या घडीला घराच्या किंमती फारच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तीला मुंबई आणि उपनगरामध्ये घर घेणं खिशाला परवडण्या सारखे नाही. त्यामुळे लाखो लोकं म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाची ऑक्टोबरमध्ये घरांच्या लॉटरीची जाहिरात येणे अपेक्षित होती. मात्र, पुरेसे घरे उपलब्ध नसल्याने लॉटरी जाहीर झाली नव्हती. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
advertisement
दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात दोन हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या 15 टक्के आणि 20 टक्क्यांमधूनच मिळणाऱ्या घरांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. कोकण मंडळाच्या ठाणे आणि कल्याण परिसरातील घरांना मोठी मागणी आहे. 2025 मध्ये 5 हजार घरांसाठी दीड लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीदेखील लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती जरीही काही प्रमाणात कमी असून नागरिकांचा त्याकडे सर्वाधिक असतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement