भारतीय क्रिकेटपटूला मिळाली नवी पार्टनर, फोटो शेअर करत केली मोठी घोषणा; घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर साखरपुडा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shikhar Dhawan Engagement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने गर्लफ्रेंड सोफी हिच्याशी साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
धवनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “हसण्यापासून स्वप्नांपर्यंत… आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या साखरपुड्याबद्दल मिळालेल्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, लग्न कधी होणार याची उत्सुकताही व्यक्त केली जात आहे.
advertisement
advertisement
या आधीच माध्यमांमध्ये धवन आणि सोफी फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लग्न होण्याची शक्यता असून, त्यासाठी भव्य समारंभाचे नियोजन सुरू आहे. हा विवाह सोहळा दिल्ली-एनसीआर परिसरात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोफी सध्या शिखर धवन फाउंडेशनच्या कामकाजात धवनसोबत सक्रियपणे सहभागी असल्याचेही सांगितले जाते.
advertisement
शिखर धवनचे याआधी आयशा मुखर्जी यांच्याशी 2012 मध्ये लग्न झाले होते. आयशा भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिक असून त्या किकबॉक्सर होत्या. या विवाहातून धवनला मुलगा जोरावर आहे, जो सध्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. आयशाच्या आधीच्या विवाहातून त्यांना दोन मुलीही होत्या. धवन आणि आयशा यांचा 2023 मध्ये दिल्लीच्या साकेत न्यायालयात घटस्फोट झाला.











