सासऱ्यांचा पक्ष चोरी केल्याचा आरोप, सासूलाही केलं साइडलाईन; 4 वेळा झाले मुख्यमंत्री, सिनेमा नाही ही रिअल लाईफ स्टोरी

Last Updated:

सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या या व्यक्तीनं सासऱ्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मग त्याच पार्टीच्या अध्यक्षांच्या विरोधात पार्टिमधील आमदार-खासदारांना करुन स्वत: त्याचे लिडर झाले.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
हैदराबाद : भारतीय राजकारणात अशा अनेक कथा आहेत ज्या कोणत्याही मोठ्या पडद्यावरील मसाला सिनेमाला मागे टाकतील. नायक, खलनायक, बंड, सत्तापालट आणि नात्यांमधील संघर्ष या सगळ्याचे मिश्रण म्हणजे आंध्र प्रदेशचे दिग्गज नेते एन. चंद्राबाबू नायडू यांचा राजकीय प्रवास. ज्यांनी एकेकाळी आपल्या सासऱ्यांच्या विरोधात बंड पुकारले, त्यांच्यावर 'पक्ष चोरल्याचा' डाग लागला, पण अखेर त्यांनी स्वतःला 'आधुनिक आंध्रचे निर्माते' म्हणून सिद्ध केलं.
या सगळ्याची सुरुवात होते दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' आणि तेलगू देसम पार्टीचे (TDP) संस्थापक एन. टी. रामाराव (NTR) यांच्यापासून. चंद्राबाबू नायडू हे एनटीआर यांचे जावई. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या चंद्राबाबूंनीनंतर सासऱ्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि बघता बघता ते पक्षाचे मुख्य रणनीतीकार बनले. मात्र, खरी ठिणगी पडली ती 90 च्या दशकात.
एनटीआर यांनी आपल्या उत्तरार्धात लक्ष्मी पार्वती यांच्याशी विवाह केला. लक्ष्मी पार्वती यांचा पक्षात आणि सरकारमध्ये वाढता हस्तक्षेप चंद्राबाबू आणि एनटीआर यांच्या मुलांच्या डोळ्यांत खुपू लागला. लक्ष्मी पार्वती यांना 'साईडलाईन' करण्यासाठी चंद्राबाबूंनी एक मोठी खेळी खेळली. त्यांना भीती होती की लक्ष्मी पार्वती यांच्यामुळे पक्ष आणि सत्ता दोन्ही हाताबाहेर जाईल.
advertisement
ऑगस्ट 1995 मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी जे केले, ते भारतीय राजकारणातील सर्वात मोठे 'कौटुंबिक बंड' मानले जाते. त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या (NTR) विरोधातच आमदारांना एकत्र केले. ज्या पक्षाची स्थापना एनटीआर यांनी केली होती, त्याच पक्षाच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आले. त्यावेळी एनटीआर यांनी आपल्या जावयावर 'पक्ष चोरल्याचा' आणि विश्वासघाताचा जाहीर आरोप केला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, एनटीआर यांचे निधन झाले तरी कौटुंबिक दरी पुसली गेली नाही.
advertisement
टीकाकारांनी कितीही आरोप केले तरी, चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला प्रगतीच्या शिखरावर नेले.
पहिली टर्म आणि दुसरी टर्म(1995-2004): त्यांनी हैदराबादला 'हायटेक सिटी' बनवले. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स असोत किंवा जागतिक बँकेचे अधिकारी, सर्वांना त्यांनी हैदराबादमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित केले.
तिसरी टर्म (2014-2019): राज्याचे विभाजन झाल्यावर त्यांनी 'अमरावती' या नव्या राजधानीचे स्वप्न पाहिले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली.
advertisement
राजकारणातील 'फिनिक्स' पक्षी
2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणूक जिंकून घेत चंद्राबाबू नायडू यांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. ज्या नेत्याला संपले असे मानले जात होते, त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. नात्यांमधील संघर्ष असो वा सत्तेची ओढ, चंद्राबाबू नायडू यांची ही 'रिअल लाईफ स्टोरी' आजही राजकीय अभ्यासकांसाठी एक मोठे कुतूहल आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
सासऱ्यांचा पक्ष चोरी केल्याचा आरोप, सासूलाही केलं साइडलाईन; 4 वेळा झाले मुख्यमंत्री, सिनेमा नाही ही रिअल लाईफ स्टोरी
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement