Roshan Bhajankar : दिवसा हमाली, रात्री जीम! BBM 6 मध्ये आलेला अमरावतीचा रोशन भजनकर आहे तरी कोण?

Last Updated:
Roshan Bhajankar Struggle Story : बिग बॉस मराठी 6 च्या घरात 13 वा सदस्य म्हणून सहभागी झालेला रोशन भजनकर नेमका आहे कोण? त्याची स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
1/9
बिग बॉस मराठी 6 मध्ये यंदाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक स्पर्धक घरात गेला आहे. प्रत्येकाची एक वेगळी ओळख घेऊन तो घरात गेला आहे. असाच एक स्पर्धक म्हणजे रोशन भजनकर. 

advertisement
2/9
विदर्भाच्या मातीत जन्मलेला, कष्ट, घाम आणि संघर्षाची ओळख असलेला बॉडीबिल्डर रोशन भजनकर बिग बॉस मराठी 6 च्या घरात एन्ट्री घेत आहे. रोशन हा एक बॉडीबिल्डर आहे. पण त्याची कहाणी ही केवळ एका बॉडीबिल्डरची नाही, तर अपार संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या एका सामान्य माणसाची आहे. अमरावतीचा हा मुलगा आज लाखो तरूणांसाठी प्रेरणा ठरत आहे.

3/9
रोशनची जीमची सुरुवात 2010-2011 साली झाली. त्या काळात परिस्थिती फारच कठीण होती. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. शाळा शिकत असतानाच कामही केलं आणि त्याचबरोबर जीमकडेही लक्ष दिलं. मात्र दहावीत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं आणि पूर्णपणे काम आणि बॉडीबिल्डिंगवर लक्ष केंद्रित केलं. दिवसाची हमाली आणि रात्रीचा वर्कआऊट केला. 

4/9
रोशन भजनकरची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. पत्नी आणि दोन मुलींचा संसार सांभाळण्यासाठी तो दररोज रेल्वेस्टेशनवर हमाल म्हणून काम करतो. सिमेंटची पोती उचलून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

5/9
रोशनला एका सिमेंटच्या पोत्यामागे फक्त 3 रुपये 45 पैसे मिळतात. दिवसभरात जितकी पोती उचलतो तितकेच पैसे त्याला मिळतात. 

6/9
दिवसभर कष्टाचं काम करून थकलेला रोशन संध्याकाळी मात्र हार मानत नाही. काम संपल्यानंतर तो थेट जीममध्ये जातो. रोशन सांगतो की,
दिवसभर कष्टाचं काम करून थकलेला रोशन संध्याकाळी मात्र हार मानत नाही. काम संपल्यानंतर तो थेट जीममध्ये जातो. रोशन सांगतो की, "दिवसभर काम करून शरीर थकून जातं. पण जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर सगळा थकवा निघून जातो. वर्कआऊटमध्ये एवढी शक्ती आहे की मी पुन्हा फ्रेश होतो आणि दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामावर जातो."
advertisement
7/9
सोशल मीडियामुळे रोशनचं आयुष्यच बदललं. हमाली करता करता रोशनने इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले. एका व्हिडीओमध्ये त्याने त्याची लाईफ जर्नी सांगितली. किती वर्ष काम करतो, किती वर्षांपासून जीम करतो, रोजचं जगणं कसं आहे, हे सगळं त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. आज त्या व्हिडीओला 25 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

8/9
 "व्हिडीओ व्हायरल झाला, लोक माझ्या मागे आले. मला मोटिवेशन मिळालं. देशाबाहेरही लोक मला ओळखू लागले", असं रोशन सांगतो. हमाल म्हणून काम करणारा माणूस सोशल मीडिया स्टार झाला.

9/9
आज रोशन केवळ जीम करत नाही तर बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्येही भाग घेतो. त्याला अनेक बक्षीसं देखील मिळाली आहेत. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून रोशन भजनकरची ही संघर्षमय, प्रेरणादायी कहाणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. 

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement