चूक असेल तरीही 'माझंच' बरोबर, 'या' 5 राशीचे लोक कधीही मागत नाहीत माफी; तुमच्या पार्टनरचीही असू शकते ही' रास!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
प्रेम हे जगातील सर्वात सुंदर नाते मानले जाते, जिथे समर्पण आणि त्याग महत्त्वाचा असतो. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. काही राशींचे लोक स्वभावाने इतके स्वाभिमानी आणि हट्टी असतात की, प्रेमाच्या नात्यात स्वतःची चूक असूनही ते लवकर झुकत नाहीत.
Astrology News : प्रेम हे जगातील सर्वात सुंदर नाते मानले जाते, जिथे समर्पण आणि त्याग महत्त्वाचा असतो. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. काही राशींचे लोक स्वभावाने इतके स्वाभिमानी आणि हट्टी असतात की, प्रेमाच्या नात्यात स्वतःची चूक असूनही ते लवकर झुकत नाहीत. 'मी कशाला माफी मागू?' हा विचार त्यांच्या मनात घर करून असतो, ज्यामुळे अनेकदा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.
सिंह रास आणि इगो
सिंह राशीचा स्वामी 'सूर्य' आहे. ज्याप्रमाणे सूर्य कोणासमोर झुकत नाही, तसेच या राशीच्या लोकांचे असते. सिंह राशीच्या लोकांमध्ये उपजतच राजेशाही थाट आणि अहंकार असतो. प्रेमात ते खूप निष्ठावान असतात, पण जेव्हा माफी मागण्याची वेळ येते, तेव्हा त्यांचा 'Ego' आड येतो. त्यांना वाटते की माफी मागितल्याने त्यांचे वर्चस्व कमी होईल. जोडीदारानेच आधी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा असते.
advertisement
वृश्चिक रास आणि त्यांचं शांत बसणं
वृश्चिक राशीचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक अत्यंत रहस्यमयी आणि तीव्र भावनांचे असतात. जर वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे जोडीदाराशी भांडण झाले, तर ते माफी मागण्याऐवजी 'सायलेंट मोड'वर जातात. ते कित्येक दिवस शांत राहू शकतात पण झुकणार नाहीत. त्यांच्या मते, त्यांची कृती योग्यच होती. त्यांचा अबोला समोरच्या व्यक्तीला अधिक त्रासदायक ठरतो.
advertisement
मकर रास आणि त्यांच लॉजिक
मकर राशीचा स्वामी 'शनी' आहे, जो शिस्त आणि नियमांचा कारक आहे. मकर राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत 'लॉजिक' शोधतात. जर भांडण झाले, तर ते माफी मागण्याऐवजी गणित मांडतात की चूक कोणाची होती? त्यांना जर वाटले की त्यांची चूक केवळ 10 टक्के होती, तर ते कधीच माफी मागणार नाहीत. भावनेपेक्षा ते व्यवहाराला आणि तर्काला जास्त महत्त्व देतात.
advertisement
कुंभ रास आणि त्यांची वेगळी विचारसरणी
कुंभ राशीचा स्वामी सुद्धा 'शनी' आहे, पण ही रास वायू तत्त्वाची आहे. या राशीचे लोक स्वतःला खूप बुद्धिमान समजतात. त्यांना वाटते की समोरच्याला त्यांची बाजू समजत नाहीये. ते माफी मागण्यापेक्षा त्या विषयावरून लक्ष भरकटवणे किंवा तो विषय सोडून देणे पसंत करतात. त्यांना वाटते की माफी मागण्याने काहीच साध्य होणार नाही, त्यापेक्षा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारलेली बरी.
advertisement
मेष रास आणि त्यांचा वेगवान स्वभाव
मेष राशीचा स्वामी 'मंगळ' असून ही अग्नी तत्त्वाची रास आहे. मेष राशीचे लोक अत्यंत रागीट आणि उतावळे असतात. रागाच्या भरात ते जोडीदाराला खूप काही बोलून जातात, पण नंतर त्यांना आपली चूक उमजते. तरीही, त्यांच्यातील अग्नी तत्व त्यांना झुकू देत नाही. ते माफी मागण्याऐवजी असे वागतात की जणू काही घडलंच नाही. त्यांच्या मते, "जे झालं ते झालं, आता पुढे चला."
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 3:53 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
चूक असेल तरीही 'माझंच' बरोबर, 'या' 5 राशीचे लोक कधीही मागत नाहीत माफी; तुमच्या पार्टनरचीही असू शकते ही' रास!










