नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी सासऱ्याने रचला सुनेच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तपासादरम्यान हा कट सासऱ्यानेच रचल्याचे निष्पन्न झाले असून, एलआयसीच्या पैशांसाठी रचलेल्या या कटप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया : लेकाच्या मृत्यूनंततर त्याच्या विम्याच्या पैशावर डोळा ठेवून सासऱ्यानेच सुनेच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीने जात असताना चारचाकी वाहनाने धडक देत हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासादरम्यान हा कट सासऱ्यानेच रचल्याचे निष्पन्न झाले असून, एलआयसीच्या पैशांसाठी रचलेल्या या कटप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे घडली.
advertisement
लग्नानंतर एक वर्षात पतीचा मृत्यू झाला. पतीच्या नावाने एलआयसी विमा असून त्याच्यावर आपले नॉमिनल म्हणून नाव आले पाहिजे म्हणून पीडित महिला अश्विनी कटरे या महिलेने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सासऱ्यांना मिळाली.. त्यानंतर सासऱ्यांनी मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे एलआयसीचे पैसे व जमीनीचा हक्क तिला मिळू नये या उद्देशाने सासर्यानेच मारण्याची सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गोरेगाव पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आली. चुडामन कटरे ( रा. गिधाडी ता. गोरेगाव) असे आरोपी सासर्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी. अश्विनी कटरे ह्या आपल्या वडीलांसह गोरेगाववरून चिल्हाटी मार्गे स्वगावी गिधाडी येथे दुचाकीने जात असताना घोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्या जखमी झाल्या. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, सदर गुन्हाच्या तपासामध्ये तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अश्विनीचा पती उमेश कटरे यांच्या मृत्यूपश्चात मिळणारे एलआयसीचे 60 लाख रुपये व जमीन तिला मिळू नये. या उद्देशाने तिचा सासरा आरोपी चुडामन कटरे याने सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तिला जीवे मारण्यासाठी 3 लाख रुपयाची सुपारी देऊन अपघात घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून गुह्यातील इतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 3:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी सासऱ्याने रचला सुनेच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश










