सर्वसामान्यांसाठी कोणती CNG कार सर्वात स्वस्त? खरेदीपूर्वी जाणून घ्या डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Affordable CNG Cars: तुम्ही एखाद्या अफॉर्डेबल सीएनची कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. खाली काही ऑप्शन्स दिले आहेत.
advertisement
Maruti S- Presso CNG : मारुती एस-प्रेसो सीएनजीची किंमत ₹4.62 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. त्यात 1.0L के-सिरीज पेट्रोल-सीएनजी इंजिन आहे जे 56 पीएस पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. त्याची इंधन कार्यक्षमता 32.73 km/kg आहे, ज्यामुळे ती तिच्या सेगमेंटमध्ये खूप किफायतशीर बनते. ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रियर पार्किंग सेन्सर्स, ईएसपी, 7-इंच टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले या फीचर्सचा समावेश आहे.
advertisement
Maruti Alto K10 CNG : Maruti Alto K10 CNG ची किंमत 4.82 लाखांपासून सुरु होते. यामध्ये 998cc K10C इंजिन आहे जे 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क देते. याचं मायलेज 33.85 km/kg (ARAI) आहे. जे याला मायलेज क्विन बनवते. ही कार 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, रियर सेन्सर आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स येतात. 7-इंच टचस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 214 लीटर बूट स्पेससह ही कार विशेषतः लहान कुटुंब आणि शहरात गाडी चालवणाऱ्यांसाटी बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
Tata Tiago CNG : टाटा टियागो सीएनजीची किंमत ₹5.49 लाख पासून सुरू होते. यात 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिन आहे जे 72 पीएस पॉवर आणि 95 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याची इंधन कार्यक्षमता 26.49 km/kg (मॅन्युअल) आणि 28.06 km/kg (एएमटी) आहे. या कारला 4-स्टार जीएनसीएपी सेफ्टी रेटिंग देखील आहे, ज्यामुळे ती सर्वात सुरक्षित बजेट कारपैकी एक बनते.
advertisement
Maruti Celerio CNG : मारुती सेलेरियो सीएनजीची किंमत ₹5.98 लाखांपासून सुरू होते. यात 998cc K10C इंजिन आहे जे 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. त्याची इंधन कार्यक्षमता 34.43 km/kg आहे. ज्यामुळे ती भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम सीएनजी कारपैकी एक बनते. सेलेरियोमध्ये सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएसपी, रिअर सेन्सर्स, 7 इंचाचा टचस्क्रीन, कीलेस एंट्री आणि ऑटो एसी सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे. 313 लिटर बूट स्पेससह, ही कार कमी किमतीत जास्त मायलेज शोधणाऱ्यांसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे.
advertisement







