TRENDING:

Sudharas Recipe : तुम्ही 'सोनसळी सुधारस'बद्दल ऐकलंय? सोपी पारंपरिक रेसिपी एकदा बनवून पाहा, खाऊन खुश व्हाल!

Last Updated:

Sonasali sudharas recipe in marathi : सोनसळी सुधारस हा अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी अनेक शुभ प्रसंगी हा सुधारस बनवला जायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्याकडे अशा अनेक पारंपरिक रेसिपी आहेत. ज्या जुन्या आणि पारंपरिक आहेत. या रेसिपी आता काळाच्या ओघात हरवत चालल्या आहेत. पाश्चात्य खाद्यपदार्थांना आपल्याकडे जितकं आवडीने खाल्लं जातं, तितकंच आवडीने पुन्हा हे जुने पदार्थ बनवण्याची आणि ते चाखण्याची गरज आहे. असाच एक पदार्थ आहे, 'सुधारस'
अशा पद्धतीनं बनवा सोनसळी सुधारस
अशा पद्धतीनं बनवा सोनसळी सुधारस
advertisement

सोनसळी सुधारस हा अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी अनेक शुभ प्रसंगी हा सुधारस बनवला जायचा. मात्र आता याचं नावसुद्धा अनेक जणांना माहित नाही. या सोनसळी सुधारसची रेसिपी foodyogawithsandhya या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.

सुधारससाठी साहित्य

- 1 वाटी साखर

- 1 वाटी पाणी (त्याच वाटीच्या मापाने)

advertisement

- 2 चिमूट केशर

- 1 छोटा चमचा वेलची पावडर

- 1 मध्यम आकाराचा रसदार लिंबू

- 1 केळं (काप करून – ऐच्छिक)

- आवडीनुसार ड्रायफ्रूट्स / बेदाणे

अशा पद्धतीनं बनवा सोनसळी सुधारस

- सर्वात आधी पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र घालून मध्यम आचेवर गरम करा.

- साखर सतत ढवळत पूर्णपणे विरघळू द्या, म्हणजे ती तळाशी लागणार नाही.

advertisement

- साखर विरघळल्यानंतर मिश्रण उकळायला लागेल.

- एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण मध्यम आचेवर साधारण 8–10 मिनिटे उकळू द्या.

- आता एका प्लेटमध्ये थोडा पाक घेऊन बोटाने एक तार तयार होते का हे पाहा.

- एक तारी पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात केशर आणि वेलची पावडर घाला.

- सुधारसाला थोडी आंबट-गोड चव असते, यासाठी त्यामध्ये एक मध्यम आकाराचं लिंबू पिळून एकत्र करा.

advertisement

- आता आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका.

- सुधारस थंड झाल्यावर एका केळ्याचे काप घाला.

अशाप्रकारे तुमचा साधा-सोपा पण चवीला अप्रतिम असा सोनसळी सुधारस तयार आहे. हा सुधारस तुम्ही गरम पुरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. मुलांना हा पदार्थ नक्की आवडेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Sudharas Recipe : तुम्ही 'सोनसळी सुधारस'बद्दल ऐकलंय? सोपी पारंपरिक रेसिपी एकदा बनवून पाहा, खाऊन खुश व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल