ठाण्याच्या माजीवाडा नाका परिसरात असलेले हे 100 गॉड्स पाव स्टॉल एगीटेरियन खवययांच्या अतिशय आवडीचे बनले आहे. त्यातच या ठिकाणी साधा ऑम्लेट किंवा भुर्जी व्यतिरिक्त स्पेशल गोवन स्टाइल रोस ऑम्लेट मिळत आहे. हा रोस ऑम्लेट चिकन व अंड्यांचे एक स्वादिष्ट कॉम्बिनेशन आहे. या 100 गॉड्स पाव स्टॉलचे मालक अनिल दमसे तीन वर्षांपासून माजीवाडा नाका ठाणे या ठिकाणी विविध प्रकारचे अंड्याचे पदार्थ विकत आहेत. या ठिकाणचे मसाले हे घऱीच तयार केले जातात. त्यामुळे चवीला अगदीच घरच्या जेवणाची आठवण येईल, अशी चव ते खवय्यांना प्रदान करतात.
advertisement
विसराळूपणा टाळायचाय? मधुमेह नियंत्रणात आणायचाय? तर नक्की खा हा पदार्थ
कसा तयार होतो गोवन रोस ऑम्लेट?
माजीवाडा नाका परिसरात असलेल्या या रोस ऑम्लेटला ठाणेकरांची विशेष पसंती आहे. हा पदार्थ एक स्पेशल गोवन पदार्थ आहे. जो सहसा गोव्यात खाल्ला जातो. हा रोस ऑम्लेट तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. एका वाटीत अंडे फोडून त्यात कापलेला कांदा, टोमॅटो व मिरची घातली जाते. त्यात चवीनुसार मीठ व मसाले देखील घातले जातात. त्या सर्व जिन्नसला एकत्र फेटून घेतल्यानंतर गरम तव्यावर तेल गरम झाल्यास ते मिश्रण ऑम्लेट प्रमाणे पसरवले जाते.
‘इथं’ मिळतीय चक्क चॉकलेट लेज शेवपुरी; तरुणांमध्ये लोकप्रिय आहे हटके पदार्थ!
ऑम्लेट तयार झाल्यास त्याला एका प्लेटमध्ये सर्व्ह केले जाते. गरम असलेल्या तव्यात कांदा व खोबऱ्याचे वाटण घातले जाते आणि त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला व हळद घालून ते एकजीव केले जाते. त्यात शिजवून घेतलेले चिकनचे बोनलेस पीस घालून त्याला चांगले उकळून घेतले जाते. तयार असलेल्या रस्शाला ऑम्लेटवर सर्व्ह केले जाते. त्यावर कोथिंबीर घातली जाते. या रोस ऑम्लेटला दोन गरम पावासोबत गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.
या रोस ऑम्लेटची किंमत या ठिकाणी 70 रुपये प्लेट अशी आहे. पॉकेट फ्रेंडली असलेल्या या स्टॉलवर एगीटेरियन खवय्यांची गर्दी होते. अशी माहिती 100 गॉड्स पाव स्टॉलचे मालक अनिल दमसे यांनी दिली आहे.