ठाण्याच्या कोपरी परिसरात असलेले अष्टविनायक कट्ट्यावर हा मिनीवडा मिळतो. हा कट्टा विणा पंढरीनाथ दाभोळकर चालवतात. येथील मिनीवडा हा आकाराने लहान असून तो एका स्टिकमध्ये अडकवून त्यावर अनेक सॉस, लेस वेफर आणि चीज घालून त्याला सर्व्ह केले जाते. या डिशला मिनीवडा स्टिक असेही म्हणतात. ज्या खवय्यांना पाव खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा मिनीवडा एक उत्तम चविष्ट पर्याय आहे.
advertisement
सुरमईचं तिखलं, रस्सेदार पापलेट, मटण भाकरी; पुणेकरांनो सुट्टीची सोय झाली, ‘इथं’ संपेल शोध!
मिनीवडाचे वैशिष्ट्ये?
सतत बटाटा वडासोबत पाव काय खायचा म्हणून काहीतरी नवीन फ्युजन असा हा मिनीवडा स्टिक प्रकार सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे खवय्ये देखील या युनिक फ्युजनला चांगला प्रतिसाद द्यायला लागल्यामुळे आता प्रत्येक ठाणेकर या ठिकाणी आवडीने मिनीवडा स्टिक आणि भट्टी वडापाव खायला येतात. हा मिनीवडा बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून त्याला बेसन लावून तेलात तळला जातो. त्यानंतर ते छोटे छोटे वडे भट्टीवर भाजून घेतले जातात. चार ते पाच वडे एका स्टिकमध्ये अडकवून त्यावर अनेक प्रकारचे सॉसेस, लेस वेफर आणि चीज घालून त्यावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले जाते. या स्वादिष्ट वडास्टिकला डिशवर सर्व्ह केले जाते.
मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल, अन् व्हा टेन्शन फ्री
या मिनीवडा स्टिकची किंमत 50 रुपये अशी आहे. हे मिनीवडा स्टिक खवय्ये अगदी चवी चवीने खातात. या मिनीवाडा स्टिक बरोबरच लोक येथील भट्टी वडापाव देखील आवडीने खातात, अशी अशी माहिती विना दाभोळकर यांनी दिली आहे.